मनसे नेते वसंत मोरे यांना पक्षातून कोण ढकलतंय, व्हिडिओ ट्विट करण्यामागील कारण ही केलं स्पष्ट
काही महिन्यांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात नाराज असल्याचे चित्र आहे, पुणे शहराध्यक्ष पदावरून बाजूला केल्याने वसंत मोरे हे नाराज आहे.
योगेश बोरसे, पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांनी अमित ठाकरे यांच्या भेटीनंतर रात्री साडेबारा वाजता एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये दोन बॅनर चिकटलेले असतांनाच तो व्हिडिओ होता. त्यामध्ये एक फोटो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तर दिसरा फोटो वसंत मोरे यांचा होता. यामध्ये वसंत मोरे यांनी राज ठाकरे आणि त्यांचे नातं दाखविण्यासाठी हा व्हिडिओ केल्याचे त्यांनी स्वतः सांगितलं होतं. मात्र, टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना वसंत मोरे यांनी मोठा आरोप केला आहे. पक्षातून मला बाहेर ढकलण्याचं काम केलं जातं आहे असा खळबळजनक आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. मात्र यापूर्वीच वसंत मोरे यांनी एक व्हॉटसअप स्टेट्स ठेवला होता त्यात त्यांनी मी एकटा नसून माझ्या सोबत महाराष्ट्र सैनिक आहे असाही इशारा वसंत मोरे यांनी दिला होता. त्यामुळे एकूणच वसंत मोरे यांची पक्षातील नाराजी अधिकच गडद झाली आहे.
काही महिन्यांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात नाराज असल्याचे चित्र आहे, पुणे शहराध्यक्ष पदावरून बाजूला केल्याने वसंत मोरे हे नाराज आहे.
इतकंच काय तर त्यांनी त्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे, मला कार्यक्रमात बोलू दिले जात नाही, कोणत्याही बैठकांना निमंत्रित केले जात नाही असा आरोप केला जात आहे.
इतकंच काय तर ज्या कार्यालयात माझ्या विरोधात कटकारस्थाने झाली, त्या कार्यालयात मी जाणार नाही अशी भूमिका घेत माझ्याबद्दल पक्षाची कोअर कमिटी निर्णय घेईल असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केले होते.
परंतु वसंत मोरे यांनी रात्री साडेबारा वाजता एक व्हिडिओ ट्विट करून वसंत मोरे आणि राज ठाकरे यांना कोणीही वेगळं करू शकत नाही असा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र यानंतर वसंत मोरे यांनी पक्षातून मला बाहेर ढकलण्याचं काम केलं जातं आहे, माझी ताकत आजमवण्यापेक्षा पक्षासाठी ताकत लावा असा टोला देखील बाबू वागस्कर यांना नाव न घेता लगावला आहे.
माझ्यासाठी फक्त राज ठाकरे प्रमाण आहे, दुसरं कुणी नाही आणि याच साठी माझं आणि राज ठाकरे यांच्यातील नातं दाखवण्यासाठी मी तो व्हिडीओ ट्विट केलाय असा खुलासा वसंत मोरे यांनी केला आहे.