अत्यंत चिंताजनक! बालविवाहामुळे कुपोषणाचे बळी वाढले? 3 वर्षात तब्बल 15,253 बालविवाह तर कुपोषणामुळे 6,582 बळी

महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांमध्ये कुपोषणामुळे साडे सहा हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

अत्यंत चिंताजनक! बालविवाहामुळे कुपोषणाचे बळी वाढले? 3 वर्षात तब्बल 15,253 बालविवाह तर कुपोषणामुळे 6,582 बळी
धक्कादायक आकडेवारीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 2:22 PM

मुंबई : महाराष्ट्रात कुपोषणामुळे (Malnutrition) होणाऱ्या बालमृत्यूचं (Child deaths) प्रमाण तर चिंताजनक आहेत. पण आता समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीतून बालविवाहाचं प्रमाणही लक्षणीय असल्याची नोंद करण्या आली आहे. बालविवाहाचं प्रमाण हे कुपोषणामुळे होणाऱ्या बळींच्या संख्येपेक्षा तब्बल दुप्पट असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) सादर करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये ही आकडेवारी देण्यात आली. आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण चिंताजनक आहे. इतकंच काय तर कुपोषणामुळे होणारे मृत्यूही चिंताजनक असल्याची आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात आदिवासीबुहल सोळ जिल्ह्यांमध्ये 15,253 बालविवाह झालेत. तर 6582 जणांचा बळी हा कुपोषणामुळे गेलाय. इंडिया टुडेच्या विद्या यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, अहवालात जारी करण्यात आलेली आकडेवारी हायकोर्टातील एका सुनावणी दरम्यान सादर करण्यात आली होती.

आकडेवारी कुठून आली?

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु होती. वकील आशुतोष कुंबकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार वरील आकडेवारी जारी करण्यात आली आहे. या अहवालात महाराष्ट्रातील बहुतांश आदिवासीबहुल सोळा जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.

सादर करण्यात आलेल्या अहवालातील ठळक नोंदी

  1. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचा तीन वर्ष अभ्यास
  2. अभ्यासात 15 हजारपेक्षा जास्त बालविवाहांची नोंद
  3. कुपोषणामुळे 6,500 हून अधिक बळी गेल्याचं समोर

बालविवाहामुळे मृत्यूचं प्रमाण चिंताजनक!

महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांमध्ये कुपोषणामुळे साडे सहा हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. त्यापैकी 601 प्रकरणांत बालविवाहाला बळी पडलेल्यांचा समावेश होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणामुळे बाराशेपेक्षा जास्त मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यातील 137 प्रकरणांमध्ये बाळाचा मृत्यू झालेली आई, ही अल्पवयीन असल्याची नोंद आहे. अमरावीतत 729 पैकी 75, गडचिरोलीत 804 पैकी 88 प्रकरणात झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूला बालविवाह कारणीभूत ठरल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे.

ठळक नोंदी…

  1. कुपोषणामुळे 3 हजार मृत्यू झालेल्या बाळांची आई अल्पवयीन
  2. नंदुरबार, अमरावतीसह, नाशिक, ठाणे पालघर आणि गडचिरोलीत कुपोषणाच्या बळींची नोंद
  3. कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखाचे असतील, तर बालविवाह सगळ्यात आधी रोखले पाहिजेत
Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.