नितेश राणे यांच्या खोचक टिकेला खासदार अमोल कोल्हेचं खुलं आव्हान, राणे यांना ठणकावून सांगितलं मी येतोय…

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये, महाराष्ट्रच्या राजकारणाला सुसंस्कृत पणाचा आदर्श आहे. असा टोला कोल्हे यांनी लगावला आहे.

नितेश राणे यांच्या खोचक टिकेला खासदार अमोल कोल्हेचं खुलं आव्हान, राणे यांना ठणकावून सांगितलं मी येतोय...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 10:57 AM

नाशिक : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी पलटवार केला आहे. यामध्ये अमोल कोल्हे यांनी आमदार नितेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना अमोल कोल्हे म्हणाले, कोण नितेश राणे? आणि कुठल्या पक्षात आहे? नितेश राणेंची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? भाजपचं राणेंना किंमत देत नाही, जे वडीलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणारे आहेत, बोलतांना संस्कार प्रकट होत असतात याचा विचार करा असा टोलाच कोल्हे यांनी लगावला आहे. याशिवाय नितेश राणे यांचे नाव घेणं टाळत त्यांनी छ. संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी काही योगदान दिलं आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

कला क्षेत्र हे माझ्या उत्पन्नाचं साधन आहे, मी उजळ माथ्याने सांगतो असं राणेंनी सांगावं असेही आवाहन कोल्हे यांनी केले आहे.

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये, महाराष्ट्रच्या राजकारणाला सुसंस्कृत पणाचा आदर्श आहे.

हे सुद्धा वाचा

जर माईक वर बोलायचं असेल तर मला ही बोलता येत.पण मी जे करतो हे त्यांना जमत का? इतिहास मांडण्यासाठी मी राजकारण आणत नाही असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

राणेंनी जर काही योगदान दिले का? क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, असे म्हणत राणेंच्या शब्दशैलीवर अमोल कोल्हे यांनी बोट ठेऊन सुनावलं आहे.

इतकंच काय मी सिंधुदुर्ग मध्ये नक्की कार्यक्रमाचे प्रयोग करेल, ते याची देही याची डोळा त्यांनी पाहावं असेही अमोल कोल्हे यांना ठणकावून सांगितलं आहे.

नितेश राणे यांनी अमोल कोल्हे यांना 24 ला आपटून टाकू असे म्हणत पैसे घेऊन रोल करतो असे म्हणत दाढी काढली तर कोणी ओळखतं का अशी टीका केली होती. त्यावर कोल्हे यांनी पलटवार केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.