Video : खासदार अमोल कोल्हेंनी वाजवला ढोल, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी ओढला रथ
काही दिवसांपूर्वी त्यांनी बैलगाडा शर्यतीत (Bull Cart Race) घोड्यावरून (Amol Kolhe on horse) घेतलेली एन्ट्री गाजत होती. त्यानंतर अमोल कोल्हेंचा आणखी एक व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे.
पुणे : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) त्यांच्या हटके स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी बैलगाडा शर्यतीत (Bull Cart Race) घोड्यावरून (Amol Kolhe on horse) घेतलेली एन्ट्री गाजत होती. त्यानंतर अमोल कोल्हेंचा आणखी एक व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओत अमोल कोल्हे फुल्ल जोशमध्ये ढोल बडवताना दिसून येत आहेत. या व्हिडिओचीही सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. शिरूर तालुक्यातील रामलिंग महाराज पालख़ी सोहळ्यात खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतः ढोल वाजवत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला,आज रामलिंग महाराज यांचा पालखी सोहळा होत असताना या सोहळ्यासाठी शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे उपस्थित होते , खेड तालुक्यातील निमगाव येथे बैलगाडा घाटात घोडीवर बसल्यानंतर आता खासदार अमोल कोल्हे यांनी पालखी सोहळ्यात ढोल वाजविल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.
अमोल कोल्हे ढोल वाजवताना
पालखी सोहळ्यात अमोल कोल्हे यांनी वाजवला ढोल… अमोल कोल्हे यांचा अनोखा अंदाज वायरल… pic.twitter.com/LAiDWtb07G
— Abhishek karande (@Abhishekkaran16) February 28, 2022
हर्षवर्धन पाटलांनी ओढला रथ
इंद्रेश्वर महादेव देवस्थानच्या यात्रेला प्रारंभ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मिरवणुकीत उपस्थित नागरिकांसोबत रथाचा दोरखंड ओढत हर हर महादेव असा जयघोष@Harshvardhanji pic.twitter.com/6jALTrcx1A
— अक्षय चोरगे (Akshay Chorge) (@AkshayChorge1) February 28, 2022
तर दुसरीकडे इंदापुरात हर्षवर्धन पाटील चर्चेत आले आहेत, कारण हर्षवर्धन पाटलांनी रथ ओढला आहे. इंदापूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. इंद्रेश्वर महादेव देवस्थानच्या यात्रेला प्रारंभ झाला असून आज पाच वाजता यात्रेनिमित्त ग्रामदैवताची आकर्षक रथातून प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील शेकडो महिला व नागरिकांनी सहभाग घेतला होता, महिलांनी कलशारोहन करत, टाळमृदंगाच्या निनादात सवाद्य ग्रामदैवताची मिरवणूक काढण्यात आली, यावेळी यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या आकर्षक रथाचा दोरखंड ओढत मिरवणुकीतील उपस्थित नागरिकांसोबत हर हर महादेव असा जयघोष करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील दिसून आले, यावेळी मोठ्या जोशपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली होती.
दोन्ही नेत्यांची लोकप्रियता मोठी
नेतेमंडळी ग्रामस्थांच्या उत्सवात सहभागी झाल्यावर ग्रामस्थांचा उत्साह तर वाढतोच, मात्र त्या नेत्याविषयी लोकांची आपुलकीही वाढते. अमोल कोल्हे आधी लोकप्रिय अभिनेते आणि आता लोकप्रिय नेते झाले आहे. तर हर्षवर्धन पाटील यांनीही राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी अनेक मोठी पदं भुषवली आहेत. दोन्ही नेत्यांचा राजकारणातला गोतवळा मोठा आहे. हे दोन्ही नेते लोकांच्या उत्सवात सहभागी होत. कार्यक्रमाला हातभार लावल्याने कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेला सुखावणारा हा क्षण आहे.
लेखी आश्वासनानंतर राजेंचं उपोषण मागे, कोणत्या मागण्या मान्य? वाचा अधिकृत यादी
‘छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले हा महाराष्ट्राचा अपमान’, चंद्रकांतदादांचा ठाकरे सरकारवर प्रहार