“महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावमध्ये यायचं नाही”; कर्नाटकने थेट आदेशच काढले; ‘या’ खासदाराला प्रवेश नाकारला…

खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव प्रवेश बंदी असल्याचे पत्र बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. धैर्यशील माने तज्ज्ञ समितीचे अध्यक्षही आहेत.

महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावमध्ये यायचं नाही; कर्नाटकने थेट आदेशच काढले; 'या' खासदाराला प्रवेश नाकारला...
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 2:40 PM

कोल्हापूरः सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला जाणाऱ्या शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटक सरकारने पु्न्हा एकदा प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांनी कर्नाटकची ही गोष्ट चुकीची असून संविधान विरोधी असल्याचे सांगितले आहे. सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज खासदार धैर्यशील माने बेळगावला जाणार होते मात्र रात्री उशिरा कर्नाटक प्रशासनाकडून धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

जवळपास गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्हा बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या या दडपशाहीविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये बेळगाव आणि सीमाभागातील पाच हुतात्म्यासोबतच या चळवळीत 108 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे.

त्यामुळे सीमाभागात मराठी बांधवांकडून दरवर्षी तिथे आदरांजली वाहण्यात येते. त्या कार्यक्रमानिमित्ताने धैर्यशील माने बेळगावला जाणार होते.

मात्र प्रवेश नाकारल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींची ही अवस्था असेल तर सीमाभागाील जनतेची काय अवस्था असेल अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव प्रवेश बंदी असल्याचे पत्र बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. धैर्यशील माने तज्ज्ञ समितीचे अध्यक्षही आहेत.

त्यामुळे न्यायालयात सुरू असलेल्या लढ्यासाठी कर्नाटक शासनाची ही नोटीस आपल्याला फायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीमालढ्यातील हुतात्म्यांना आज आदरांजली वाहण्यात येते, मात्र त्या कार्यक्रमालाही कर्नाटकने प्रवेश बंदी घातली आहे. सीमालढ्यातील हुतात्म्यांनाही आदरांजली वाहण्यासाठी जर कर्नाटक प्रशासनाला मान्य नसेल तर ही कर्नाटककडून ही दडपशाही गेल्या कित्येक वर्षापासून सुरुच आहे.

त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो असंही त्यांनी यावेळी सांगितले. आपण लोकांची लोकप्रतिनिधी असूनही आणि केंद्र सरकारचे काम करत असतानाही जर एकाद्या राज्याकडून ही अशा पद्धतीने जर वागणूक मिळत असेल तर ती चूक आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.