खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचा पाय आणखी खोलात, प्रशासनानेही कंबर कसली

सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (MP jay siddheshwar swami in trouble) यांच्या अडचणींची मालिका सुरु झाली आहे.

खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचा पाय आणखी खोलात, प्रशासनानेही कंबर कसली
Follow us
| Updated on: Feb 28, 2020 | 10:13 AM

सोलापूर : सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (MP jay siddheshwar swami in trouble) यांच्या अडचणींची मालिका सुरु झाली आहे. खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात आता प्रशासनानेसुद्धा कंबर कसली आहे. खासदार महास्वामींविरोधात आता लवकरच प्रशासन न्यायालयात फिर्याद दाखल करणार आहे. खासदार शिवाचार्यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्याने, त्यांच्या खासदारकीवरच टांगती तलवार आहे. (MP jay siddheshwar swami in trouble)

जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरविला. शिवाय जातपडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात अनुसूचित जाती जमातीसाठी असलेले लाभ घेतल्याच्या कारणावरुन अक्कलकोट आणि उमरगा तहसीलदारांना न्यायालयात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता समितीच्या या आदेशानुसार लवकरच न्यायालयात लेखी फिर्याद दाखल करणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला, जयसिद्धेश्वर शिवाचार्यांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड

24 तारखेला सोलापूरच्या जात पडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांचा बेडा जंगम जातीचा दाखला अवैध ठरविला. जात पडताळणी समितीच्या अहवालाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाली असून, समितीने दिलेल्या आदेशानुसार अक्कलकोट आणि उमरगा येथील तहसीलदार हे न्यायालयात फिर्याद दाखल करणार आहेत. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

खासदारकी वाचवण्यासाठी धडपड

सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य (BJP MP Jay Siddeshwar Shivachrya caste certificate issue) हे आपली खासदारकी वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरविलं आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. मात्र आता खासदार महोदयांनी जात प्रमाणपत्रासंदर्भात वेगळीच तक्रार दिली आहे. अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार, खासदारांनी केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (Solapur Mp Jay Siddheshwar Swami in trouble) यांचं जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला आता समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी आता धोक्यात आली आहे. (Solapur Mp Jay Siddheshwar Swami in trouble)

सोलापूर लोकसभा निवडणूक

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत ते ‘जायंट किलर’ ठरले होते.

संबंधित बातम्या 

भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांना धक्का, जातीचा दाखला रद्द, खासदारकी धोक्यात

महाराष्ट्रातील भाजप नेत्यावर खासदारकी रद्द होण्याची टांगती तलवार

प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला, जयसिद्धेश्वर शिवाचार्यांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.