“निवडणूक आयोगाच्या मनात निकालाबाबत द्विधा अवस्था”; ठाकरे गटाच्या नेत्यानं थेट निवडणूक आयोगावरच संशय केला व्यक्त
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या निकालाविषयी मत व्यक्त करताना म्हटले आहे की, न्यायालयाचा निकाल काहीही लागो, मात्र शिवसेना आणि ठाकरे गट हे नाते कोणीही तोडू शकत नाही
उस्मानाबादः महाराष्ट्रात बंडखोरी करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यामुळे त्यावेळेपासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा न्यायालयीन लढा सुरु असल्याने त्याबद्दल बोलताना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाला मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र निवडणूक आयोगावरच ओमराज निंबाळकर यांनी संशय व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणावरून वाद सुरू होऊन हा वाद न्यायालयात गेला. त्यानंतर दोन्ही गटाकडून वेगवेगळे मुद्दे मांडत हे चिन्ह आपलेच कसे आहे यावर दावा केला जात आहे.
तर दुसरीकडे मात्र खासदार ओमराज निंबाळकर यांनी निवडणूक आयोगाच्या मनात निकालाबाबत द्विधा अवस्था आहे अशी टीका करण्यात आली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या निकालाविषयी मत व्यक्त करताना म्हटले आहे की, न्यायालयाचा निकाल काहीही लागो, मात्र शिवसेना आणि ठाकरे गट हे नाते कोणीही तोडू शकत नाही असा विश्वासही यावेळी त्यांनी ठाकरे गटाविषयी व्यक्त केला आहे.
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही त्यांच्या काळात याच प्रकारे लढा द्यावा लागला होता. त्यावेळीही न्यायालयीन लढा उभा केला गेला असला तरी जनतेने त्यांना पाठिंबा दिला होता
आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्या यशस्वी झाल्या होत्या. मात्र सध्याच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत असे घडणे चुकीचे असल्याचे मतही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.