महापुरुषांना विशिष्ट जातीपुरतं मर्यादित ठेवू नका, खासदार प्रीतम मुंडे यांचं युवकांना आवाहन, कारणही सांगितलं

महापुरुष हे अनेक पिढ्यांसाठी चांगल काम करून ठेवतात, असंही प्रीतम मुंडे यांनी सांगितलं.

महापुरुषांना विशिष्ट जातीपुरतं मर्यादित ठेवू नका, खासदार प्रीतम मुंडे यांचं युवकांना आवाहन, कारणही सांगितलं
प्रीतम मुंडे
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 4:19 PM

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) मी प्रोफेशनल या अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी आले. माझ्यासारख्या काही मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले. अशी माहिती खासदार प्रीतम मुंडे यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना दिली. अतिशय सुंदर मार्गदर्शन काही मान्यवरांनी केलं. हा एक सकारात्मक कार्यक्रम आहे. त्यामधून मी आता बाहेर पडत आहे. त्यामुळं सकारात्मक चर्चा कराव्यात असं माझं म्हणणं असल्याचं खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) म्हणाल्या.

मी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना (Student) संदेश देण्याचं काम करत होती. महापुरुषांना त्यांच्या जातीचे लेबल लावता कामा नये. यामुळं संकुचित वृत्ती विद्यार्थ्यांपुढं येईल. एखादा व्यक्ती महापुरुषाच्या श्रेणीत जाऊन बसतो. कारण ती व्यक्ती एखाद्या समाजाचा किंवा धर्माचा विचार करत नाही. महापुरुष हे अनेक पिढ्यांसाठी चांगल काम करून ठेवतात, असंही प्रीतम मुंडे यांनी सांगितलं.

महापुरुषांविषयी सर्वांनाच आदरभाव असतो. एखाद्या महापुरुषाला त्यांच्या समाजापुरतं मर्यादित केलं जात असेल, तर तो त्या महापुरुषाच्या कामाविषयी कृतघ्नतेचा भाव आहे, असं मला वाटते. असं खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितलं.

राजकारणासाठी महापुरुषांचा वापर केला जात असल्याचं दिसून येते. या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांनी हे विचार व्यक्त केले. महापुरुषाला जातीपुरतं मर्यादित ठेऊ नका, असं त्यांचं या माध्यामातून म्हणणंय.

प्रीतम मुंडे या प्रोफेशनल कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणं टाकलं. सकारात्मक कार्यक्रमाला आली असल्यानं सकारात्मकचं बोलणार, असंही माध्यमांना सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.