कार्यकर्त्यांना दारू-मटण नाही तर किमान ‌चटणी-भाकर मिळायला हवी…असं कोणता नेता म्हणाला…

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे असून हजारो कार्यकर्ते घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

कार्यकर्त्यांना दारू-मटण नाही तर किमान ‌चटणी-भाकर मिळायला हवी...असं कोणता नेता म्हणाला...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 2:53 PM

मनोज गाडेकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झालेले शिर्डीचे (Shirdi) खासदार हे हजारो कार्यकर्त्यांना घेऊन शिर्डीहून मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना झाले आहे. सात ते आठ हजार कार्यकर्ते घेऊन शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे घेऊन जात असल्याचा दावा केला आहे. त्यातच टीव्ही 9 मराठीशी बोलतांना खासदार सदाशिव लोखंडे यांनी खळबळ उडवून देणारं विधान केले आहे. कार्यकर्त्यांना दारू-मटण नाही किमान चटणी-भाकर, भाजी-भाकर तरी मिळायला ही ही तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवली असल्याचे खासदार लोखंडे यांनी म्हंटले आहे. त्यामुळे कार्यकर्त्याच्या जेवणावळीवर लोखंडे यांनी केलेल विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे असून हजारो कार्यकर्ते घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातून जवळपास सात ते आठ हजार कार्यकर्ते मुंबईतील बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचा दावा लोखंडे यांनी केला आहे.

यावेळी कार्यकर्त्यांनीची देखभाल करणे हे नेत्यांचे काम असून कार्यकर्ते हे पहाटेपासूनच उठले आहेत. त्यामुळे भुकेलेल्या अन्न द्यावे लागेल ना ? असा सवाल लोखंडे यांनी उपस्थित केला.

दारू – मटण नाही तर कार्यकर्त्यांना किमान ‌चटणी-भाकर, भाजी-भाकर तर मिळायला हवी ही तयारी मुख्यमंत्री यांनी दाखवली आहे अशी प्रतिक्रिया लोखंडे यांनी दिली आहे.

दसरा मेळाव्याला जात असतांना कोणालाही पकडून नेट नसल्याचा दावा खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला आहे.

बाळासाहेबांचा वारसा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे जातायत, त्यांना बळ मिळावे, राज्याच्या प्रगतीला हातभार लागावा म्हणुन कार्यकर्ते मेळाव्यास जात आहेत.

राज्य प्रगतीपथावर नेण्याची तसेच शिवसेनेची भुमिका मुख्यमंत्री आज बीकेसी मैदानावर मांडतील असेही लोखंडे यांनी सांगितले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.