किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी सिमेंटचा वापर केल्यानं खासदार संभाजी राजे नाराज
छत्रपती संभाजी राजे यांनी तीर्थक्षेत्र माहूर इथल्या रामगड किल्ल्याची पाहणी केली. या सर्व परिसराची भ्रमंती करत त्यांनी इथल्या विद्रुपीकरणा बाबत खंत व्यक्त केलीय.
राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे (Chatrapati Sambhaji raje) यांनी आज माहुरगडावर येत रेणुका मातेचे दर्शन घेतलंय, यावेळी राजे यांनी रेणुका मातेची आरती करत आशीर्वाद घेतले. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी तीर्थक्षेत्र माहूर इथल्या रामगड (Ramgad) किल्ल्याची पाहणी केली. या सर्व परिसराची भ्रमंती करत त्यांनी इथल्या विद्रुपीकरणा बाबत खंत व्यक्त केलीय. कारण संभाजीराजेंना इथल्या किल्ल्याला सिंमेट वापरल्याने दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा ऐतिकासिक वारसा आहे. त्यांची सगळ्यात मोठी आठवण म्हणजे त्यांच्या पायांचा स्पर्श झालेले किल्ले. याच किल्ल्यांवर वास्तव्य करत महाराष्ट्राजांनी अटकेपार झेंडा रोवला. या किल्ल्यांनी महाराजांच्या ऐतिहासिक लढल्याला बळ दिले, त्या किल्ल्यांची आवस्था आझ बिकट होत असल्याने संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
पूर्वीच्या काळी या गडकिल्ल्यांना मोठे दगड वापरण्यात यायचे, याचे बांधकाम एवढे अचूक आणि मजबूत असायचे की त्याना भेदने दुष्मणाला शक्य नसायचे. मात्र जरी वर्षे पालटतील तशी किल्ल्यांची आवस्था बिकट होत गेली आहे. आता काही किल्ल्यावर तर फक्त पडक्या भिंती आणि दगड दिसतात, त्यामुळे किल्ल्यांच्या सवर्धनासाठी योग्य ती पावलं उचलणं गरजेचे आहे.
हा वारसा जोपासण्यासाठी निधी कसा मिळेल? याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचे संभाजीराजे त्यांनी सांगितलंय. तसेच इथल्या किल्ल्यात सिमेंटचा वापर करत केलेल्या दुरुस्तीवर त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून माहुरच्या किल्ल्याला दत्तक घेऊन विकास साधता येईल का? ते पाहणार असल्याचे त्यांनी सांगितलंय.