संजय राऊत यांनी थोपटले दंड… मी येतोय…शिवसैनिकांना राऊत काय म्हणाले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी संजय राऊत आहेत, त्यामुळे नाशिकला संजय राऊत यांचे दौरे मोठ्या प्रमाणात होत असतात.

संजय राऊत यांनी थोपटले दंड... मी येतोय...शिवसैनिकांना राऊत काय म्हणाले
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 12:49 PM

नाशिक : नुकताच खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांचा वाढदिवसही नुकताच पार पडला आहे. या दरम्यान राज्यातील अनेक शिवसैनिकांनी संजय राऊत यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहे. नाशिकमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील संजय राऊत यांना भेटून पुष्पगुच्छ भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मात्र मी येतोय, निवडणुकीसाठी सज्ज व्हा अशा सूचना देत लवकरच नाशिक दौरा करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. संजय राऊत यांना खरंतर पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केली होती. 103 दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. कोठडीत राहिलेल्या संजय राऊत यांना मागील आठवड्यात जामीन मिळाला होता. तेव्हाही नाशिकचे पदाधिकारी राऊत यांच्या भेटीला गेले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी संजय राऊत आहेत, त्यामुळे नाशिकला संजय राऊत यांचे दौरे मोठ्या प्रमाणात होत असतात.

ईडीने अटक करण्यापूर्वी देखील संजय राऊत यांचा नाशिकमध्ये दौरा झाला होता, त्यातनंतर आता जामीन झाल्यावर देखील संजय राऊत नाशिकचा दौरा करणार आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांच्या अटकेनंतर आणि त्यापूर्वी शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर नाशिकमधील आमदार, खासदार शिंदे यांच्यासोबत गेले आहेत मात्र, पदाधिकारी मात्र अद्यापही ठाकरे यांच्याकडेच आहे.

ठाकरे गटाच्या दृष्टीने नाशिक महत्वाचा विभाग आहे, विशेषतः शहरात देखील शिवसेनेची ताकद अधिक असून दोन आमदार आणि एक खासदार गेले असले तरी पदाधिकारी टिकून आहेत.

याच जोरावर संजय राऊत आक्रमक होऊन आता नाशिक दौरा करणार आहे, लवकरच नाशिक दौरा करणार असून मी येतोय निवडणुकीसाठी सज्ज व्हा अशा सूचना राऊत यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

चाळीस आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतरही नाशिकमध्ये या तोडफोडीची झळ बसली नाही. त्यामुळे खासदार राऊत यांनी शिवसेनेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.