शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्यासाठी संभाजी राजे येत आहेत, उदयनराजे कुठे आहेत?; संजय राऊत यांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे संतप्त झाले आहे. आज छत्रपती संभाजीराजे हे अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करणार आहेत. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्यासाठी संभाजी राजे येत आहेत, उदयनराजे कुठे आहेत?; संजय राऊत यांचा सवाल
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 2:04 PM

Sanjay Raut On Sambhaji Raje arabian sea Statue Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारक बांधू अशी घोषणा केली होती. यानंतर त्यांनी मोठ्या थाटामाटात जलपूजनही केले होते. या घटनेला 8 वर्ष उलटून गेल्यानंतर अद्याप या स्मारकाचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे संतप्त झाले आहे. आज छत्रपती संभाजीराजे हे अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करणार आहेत. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे हे अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करणार आहेत, याबद्दल विचारणा करण्यात आलाी. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केले. छत्रपती शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत, त्या सर्वांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले.

“जगातील फार मोठं स्मारक बांधू”

शिवाजी महाराजांचे स्मारक शोधण्याची जबाबादारी या देशातील 11 कोटी जनतेची आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या स्मारकाचं पूजन झालं होतं. यासाठी भाजपने फार मोठा गाजावाजा केला होता. जगातील फार मोठं स्मारक बांधू, असं भाजपने म्हटलं होतं. जर संभाजीराजे छत्रपती स्मारक शोधत असतील, तर त्यांना पाठिंबा आहे, असे सजंय राऊत म्हणाले.

“आम्ही त्यांच्या पाठीशी”

संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, पण खरंतर त्यांच्यासोबत उदयनराजे भोसलेंनीही जायला हवं. जे कोणी छत्रपती शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत, त्या सर्वांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असेही संजय राऊतांनी सांगितले.

मुंबईत पोहोचताच जोरदार भाषण

दरम्यान छत्रपती संभाजीराजे हे पुण्याहून मुंबईत अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत लाखो शिवप्रेमी आणि शिवभक्तही पाहायला मिळत आहेत. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी मुंबईत पोहोचताच जोरदार भाषण केले. यावेळी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले.

तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.