“2014 साली भाजपचे वरिष्ठ नेते त्यांचा युती तोडायचा कार्यक्रम घेऊन आलेले, हे त्यांचं ठरलेलं. चर्चा सुरु होती. माननीय बाळासाहेब ठाकरे त्यावेळी हयात नव्हते. याचा फायदा घ्यावा आणि या निमित्ताने शिवसेनेला आपण संपवाव हे त्यांचं एक धोरण, योजना होती. हिंदुत्ववादी दाखवत असले तर फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आलेले. आकडा सोडून द्या, भाजपा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणस नव्हती, तेव्हा आम्ही भाजपाला खाद्यावर घेऊन गावागावात फिरवलं” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “पार्ल्यात पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या विजयानंतर भाजपला साक्षात्कर झाला, महाराष्ट्रात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आपल्या सोबत असतील, तरच या देशात आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करु शकतो” असं संजय राऊत म्हणाले.
“बाळासाहेबांनी सांगितलं, हिंदुत्वाच्या नावावर मतांची विभागणी नको. बाबरी प्रकरणानंतर संपूर्ण देशात लढणार होतो. शिवसेनाप्रमुखांच्या नावाची लाट निर्माण झालेली. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात अशा हिंदू भाषिक पट्टयात 60 ते 65 जागा लढायच नक्की होतं. तेव्हा लोकसभेला 40 जागा निवडून येतील, याची खात्री होती. आमची तयारी सुरु असताना हे जेव्हा जाहीर केलं, तेव्हा भाजपचे धाबे दणाणले. अटलजींचा बाळासाहेबांना फोन आला. अटलजींनी बाळासाहेबांना सांगितलं, तुम्ही देशात निवडणुका लढत आहात, त्याने भाजपच नुकसान होईल. हिंदुत्ववादी मत विखुरली जातील. भाजपाचा पराभव आणि काँग्रेसचा फायदा होईल, मी विनंती करतो उमेदवार मागे घ्या. त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं राज्यबाहेर लढत आहोत उमेदवार मागे घ्या, नाहीतर राष्ट्रीय स्तरावर आम्हीच होतो” असा दावा संजय राऊत यांनी केला.
‘एका-एकाजागेवर 72-72 तास चर्चा’
“पण २०१४ साली एका-एकाजागेवर 72-72 तास चर्चा चालली होती. मी तेव्हा होतो, ओम माथुर प्रभारी होते. आम्ही हा खेळ पाहत होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजप युती तुटू नये या मताचे होते. हे मी प्रामाणिकपणे सांगेन. त्यावेळी युती करण्यासदंर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती. पण भाजपच वरुन ठरलेलं असल्यामुळे युती तुटली” असं संजय राऊत म्हणाले.