भाजप खासदार सुभाष भामरेंना चिकनगुनियाची लागण, उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल

माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनाही चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या विशेष विमानानं डॉ. भामरे यांना मुंबईला नेण्यात आलं आहे.

भाजप खासदार सुभाष भामरेंना चिकनगुनियाची लागण, उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल
भाजप खासदार सुभाष भामरे उपचारासाठी मुंबईत दाखल
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 9:11 PM

धुळे : खासदार सुभाष भामरेंना चिकनगुनियाची लागण, उपचारासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना धुळे : कोरोना प्रादुर्भावासह राज्यातील अनेक भागात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाची साथ पाहायला मिळत आहे. माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनाही चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या विशेष विमानानं डॉ. भामरे यांना मुंबईला नेण्यात आलं आहे. (BJP MP Subhash Bhamre contracted chikungunya, Admitted to Mumbai for treatment)

गेल्या काही दिवसांपासून सुभाष भामरे आजारी आहेत. रुग्णालयात उपचार सुरु असताना आज त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना हवाई दलाच्या विशेष विमानानं तातडीने मुंबईला हलविण्यात आलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुभाष भामरे यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना धुळे इथल्या त्यांच्याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांना चिकनगुनियाची लागण झाली. कालपासून त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार वायू दलाच्या विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली. हे विमान बंगळुरू इथून आज सकाळी धुळ्यात पोहोचलं. त्यानंतर तातडीने डॉ. भामरे यांना बंगळुरुला हलविण्यात आलं. डॉ. भामरे यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात पुढील उपचार केले जाणार आहेत.

मुंबईत डेंग्यू, मलेरियाची साथ

आता मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाची साथ आली आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यामुळे पालिकेतील रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे.

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कहर

केवळ ऑगस्ट महिन्यात 790 मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर, डेंग्यूचे 132 रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण 209 रुग्णांची नोंद झाली आहे.जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या 3338 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ महिन्यांत 1848 गॅस्ट्रो रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून मुंबईत मलेरियाचे 3338 रूग्ण, लेप्टोस्पायरोसिसचे 133 रूग्ण, डेंग्यूचे 209, गॅस्ट्रो आजाराचे 1848, तर काविळीचे 165 तसेच स्वाइन फ्लू आजाराचे 45 रूग्ण गेल्या आठ महिन्यांत आढळले असल्याचे सांगण्यात आले.

नाशिककर चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या साथीने हैराण!

सध्या नाशिकमध्ये व्हायरल फिव्हर, इन्फ्लूएन्झा, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजारांचं प्रमाण जास्त आहे. व्हायरल फिव्हरमध्ये अनेक रुग्णांना औषध-गोळ्या घेऊनही ताप उतरत नसल्याचं दिसतंय. इन्फ्लूएन्झामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी, खोकला, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणं दिसत आहेत. अनेकांचा ताप आठवडाभर जात नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये दुसराच काही आजार झाल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर तपासण्या आणि चाचण्या केल्यास त्याचाही आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत आहे.

इतर बातम्या :

‘महानिर्मिती’ राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

बारा बलुतेदार समाज घटकाला न्याय मिळवून देणार, नाना पटोलेंची ग्वाही

BJP MP Subhash Bhamre contracted chikungunya, Admitted to Mumbai for treatment

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.