‘मंत्रिपद गेल्यानंतर बावनकुळेंचा अभ्यास कच्चा झाला’, विनायक राऊतांचा टोला

वीज कंपन्यांची थकबाकी आजही वसूल झालेली नाही. ती तशीच आहे, असेही राऊतांनी सांगितले. (Vinayak raut Criticized Chandrashekhar Bawankule) 

'मंत्रिपद गेल्यानंतर बावनकुळेंचा अभ्यास कच्चा झाला', विनायक राऊतांचा टोला
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 9:45 PM

मुंबई : “माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर त्यांचा अभ्यास कच्चा झाला आहे,” असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगावला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील वीज कंपन्यांची थकबाकी आजही वसूल झालेली नाही. ती तशीच आहे, असेही राऊतांनी सांगितले. (Vinayak raut Criticized Chandrashekhar Bawankule)

“चंद्रशेखर बावनकुळे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर अभ्यास कच्चा झाला आहे. गेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील वीज कंपन्यांची थकबाकी आजही वसूल झालेली नाही. ती तशीच आहे. त्यात कोरोनाच्या संकटात महाविकासआघाडी सरकारवर ओझं पडलं आहे. त्यामुळे दुर्देवाने वीजबिल थकबाकी वसूल करण्याशिवाय काहीही शिल्लक राहिलेलं नाही,” असे विनायक राऊत म्हणाले.

“यांना मी एवढच सांगू इच्छितो की, महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे 25 हजार कोटी आणि एनडीआरएफचा नुकसानभरपाईचा निधी अद्याप केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेला नाही. यासाठी बावनकुळेंनी दिल्लीत उपोषण करावं. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात हे सिद्ध होईल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

कर्नाटकचा जो कोणी मंत्री आहे. त्याची अक्कल गुडघ्यात आहे असं दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचं शौर्य हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू नये. खऱ्या अर्थाने कर्नाटकचे सरकारच्या सीमावादाबद्दलचा जो अतिरेक चालला आहे. त्यामुळे मी पंतप्रधानांकडे मागणी केले की बेळगाव सीमावाद प्रश्न पंतप्रधानांनी हा भाग केंद्रशासित करावा. असे विनायक राऊतांनी सांगितले.

महाराष्ट्र-बेळगाव सीमा वादप्रकरणी बेळगावला केंद्रशासित राज्य करावा: विनायक राऊत

मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारनं राज्य सरकार सोबत चर्चा करावी. स्थगिती उठविण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडावी. महाराष्ट्र-बेळगाव सीमा वादप्रकरणी बेळगावला केंद्रशासित राज्य करावा, अशी मागणी विनायक राऊतांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय बैठकीत कृषी कायद्यांवर चर्चा झाली. (Vinayak raut Criticized Chandrashekhar Bawankule)

संबंधित बातम्या : 

मुलाच्या चौकशीनंतर किरीट सोमय्या आक्रमक, कथित जमीन घोटाळा प्रकरणात कर्जत तहसीलदारला भेटणार

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल, अजित पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.