Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, MPSC बाबत महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

या बैठकीत SEBC प्रवर्गातील 48 विद्यार्थ्यांसह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलीय.

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, MPSC बाबत महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
एमपीएससी, दत्तात्रय भरणे
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 5:38 PM

मुंबई : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मागील दीड वर्षापासून नियुक्ती मिळत नसल्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली आहे. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर अखेर महाविकास आघाडी सरकारला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, याबाबत आज पार पडलेल्या बैठकीत MPSCने 817 जागांची शिफारस केली होती त्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत SEBC प्रवर्गातील 48 विद्यार्थ्यांसह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलीय. (Mahavikas Aghadi government regarding MPSC meeting held in the presence of Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत MPSC ने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाल्याची माहिती भरणे यांनी दिलीय. SEBCच्या जागांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. आज संध्याकाळपर्यंतच तो अभिप्राय येईल, असं सांगतानाच आयोगावर 31 जुलैपर्यंत सदस्यांची रिक्त पदे भरली जातील असंही भरणे यांनी सांगितलं.

MPSCच्या 817 पदांची भरती लवकरच

या बैठकीत 48 SEBC सह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली आहे. MPSCच्या 817 पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. SEBC च्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असा दावा यावेळी भरणे यांनी केलाय. तसंच 31 जुलैपर्यंत MPSC आयोगावर 4 सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

MPSC च्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचना

त्याचबरोबर UPSC च्या धर्तीवर राज्यात MPSC च्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचनाही आजच्या बैठकीत अजित पवार यांनी MPSCला दिल्याचं भरणे म्हणाले. 15 हजार 717 पदांच्या भरतीची प्रक्रियाही लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना काळात वित्त विभागाने शासकीय भारतीवर बंदी आणली होती. ही पदे भरण्यासाठी ती बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही भरणे यांनी सांगितलं.

आयोगावर अधिक सदस्य नेमण्याची मागणी

केरळच्या धर्तीवर एमपीएससी आयोगात अधिक सदस्य नेमण्यास राज्यपाल यांनी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. कारण 6 हजार उमेदवारांची मुलाखत घेणे बाकी आहे. अधिक सदस्य असतील तर लवकर मुलाखती होतील, अशी मागणीही या बैठकीतून करण्यात आल्याचं भरणे म्हणाले.

संबंधित बातम्या :

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

युवी पिढी नैराश्यात, MPSC परीक्षा घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या; रोहित पवार यांची सरकारला विनंती

Mahavikas Aghadi government regarding MPSC meeting held in the presence of Ajit Pawar

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.