MPSC Exam : एमपीएससीने मोठी भरती काढली, किती पदांची जाहिरात निघाली? वाचा एका क्लिकवर
एमपीएससीने पुन्हा मोठी भरती (Mpsc Exam) काढली. तशी माहितीत एमपीएससी आयोगाकडून ट्विटवर देण्यात आली आहे. तसेच राहिरातही त्यांनी आपल्या ट्विटवर पोस्ट केली आहे.
मुंबई : एसपीएससीच्या (Maharashtra Public Service Commission) विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण एमपीएससीने पुन्हा मोठी भरती (Mpsc Exam) काढली. तशी माहितीत एमपीएससी आयोगाकडून ट्विटवर देण्यात आली आहे. तसेच राहिरातही त्यांनी आपल्या ट्विटवर पोस्ट केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना (Mpsc Students) आता त्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर एमपीएससी आयोगाकडून यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीच्या अनेक विद्यार्थ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आता विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करता येणार आहे. लवकर जाहिरात प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/Pe6xVANAWw
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 18, 2022
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. अनेकदा परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. त्यावरून अनेकदा विद्यार्थी आणि सरकार आमनेसामने आल्याचेही दिसून आले आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांनी आंदोलनही केली आहे. यावरून राजकारणही तापलं आहे. गेल्या दोन वर्षात फक्त एमपीएसच्या विद्यार्थ्यांचेच नाही. तर इतर विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे परीक्षा लवकरात लवकर उरकून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने ही जाहिरात काढण्यात आली आहे.
एमपीएससीचा कालचा निर्णय काय?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब 2020 च्या पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरून विद्यार्थांना ऑनलाईन हॉल तिकीट डाऊनलोड करता योणार आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, कोरोनाचे संकट लक्षात घेता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. या संदर्भात आयोगाकडून एक ट्विट करण्यात आले असून, परीक्षेला येताना तसेच हॉलतिकीट डाऊनलोड करताना काय काळजी घ्यावी याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूरच्या कौशिकी जाधव हिची भरारी, ऑस्ट्रेलियातील शिक्षणासाठी मिळवली 83 लाखांची शिष्यवृत्ती