MPSC 2020 Exam Date | विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! एमपीएससीची मुख्य परीक्षा 4 डिसेंबरला
MPSC Exam | विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! राज्यसेवा मुख्य परीक्षा 4 डिसेंबरला, 6 केंद्रांवर परीक्षेचे आयोजन
मुंबई : एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर करण्यात आली असून तिचे आयोजन येत्या 4 डिसेंबरला केले जाईल.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 येत्या चार डिसेंबरला
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर जाहीर करण्यात आली आहे. येत्या चार डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाईल. या मुख्य परीक्षेसोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन येत्या 18 डिसेंबर रोजी केले जाईल. मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्याची आयोगाकडे विद्यार्थी करत होते मागणीय. एमपीएससी आयोगाने या तारख्या जाहीर केल्या आहेत.
सहा केंद्रांवर परिक्षेचे आयोजन
मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत एमपीएससी आयोगाने या परीक्षांबाबत स्वतंत्र परिपत्रक काढलं. तसेच या परिपत्रकाद्वारे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 तसेच अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा यांच्या तारखा जाहीर केल्या. या परीक्षा राज्यात एकूण सहा केंद्रावर आयोजित केल्या जाणार आहेत. औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर ,नाशिक, पुणे या जिल्ह्यांतील केंद्रावर या परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 18 डिसेंबर, 2021 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 13, 2021
इतर बातम्या :
मुंबईत महिला सुरक्षित कशा राहणार? पोलीस आयुक्तांच्या 10 मोठ्या सूचना
राज्यात 15 ऑक्टोंबरपासून होणार ऊसाचे गाळप, साखर कारखान्यांचे ‘बॅायलर’ पेटणार
Gold Price Today : सोने खरेदी करणे महागले, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भावhttps://t.co/raMBz3CE6K#Gold |#Silver |#Rate |#Hike |#GoldMarket
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2021