HSC Results Live Update | बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 90.66%

फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.

HSC Results Live Update | बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 90.66%
Follow us
| Updated on: Jul 16, 2020 | 5:52 PM

HSC Results Live Update : पुणे : बारावी एचएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66% लागला असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 95.89 टक्के इतका लागला, तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) लागला. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असून तिथे 92.50 टक्के, तर मुंबई विभागातून 89.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल. (MSBSHSE HSC Result 2020)

कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?

सर्वाधिक – कोकण विभाग – 95.89 टक्के सर्वात कमी – औरंगाबाद – 88.18 टक्के

कोकण – 95.89 टक्के पुणे – 92.50 टक्के कोल्हापूर – 92.42 टक्के अमरावती – 92.09 टक्के नागपूर – 91.65 टक्के लातूर – 89.79 टक्के मुंबई –89.35 टक्के नाशिक – 88.87 टक्के औरंगाबाद – 88.18 टक्के

कोणत्या शाखेचा निकाल किती टक्के?

विज्ञान – 96.93 टक्के वाणिज्य – 91.27 उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – 86.07 कला – 82.63

निकालाची वैशिष्ट्ये

परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 14,13,687 उत्तीर्ण विद्यार्थी – 12,81,712 उत्तीर्ण मुलींची टक्केवारी – 93.88 उत्तीर्ण मुलांची टक्केवारी – 88.04 दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – 93.57 टक्के उत्तीर्ण पुनर्परीक्षार्थी निकाल – 39.03 टक्के उत्तीर्ण 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल 

कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलैचा उत्तरार्ध आला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल, असं सांगितलं होतं.

इथे पहा : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या सूचना

1.  गुण पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्रासाठी मंडळाकडून ऑनलाईन सोय. 2.  http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर सोय 3.  स्वत:च्या किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय 4. गुणपडताळणीसाठी शुक्रवार 17 जुलै ते सोमवार 27 जुलैची वेळ 5.  छायाप्रतीसाठी शुक्रवार 17 जुलै ते बुधवार 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करा 6. शुल्कही ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल 7.  पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य, ती ऑनलाईन घेता येईल 8. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसाच्या आत फीसह ऑनलाईन अर्ज करावा. 9. सर्व विषयात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोनच संधी श्रेणी/गुणसुधार उपलब्ध असतील 10. अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

निकाल कसा पाहाल ?

?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

?त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.

?यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

एसएमएसवर निकाल

बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन 57766 वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाईल. (MSBSHSE HSC Result 2020)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.