चुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंपन्यांवर महावितरणची कारवाई, राज्यातल्या 6 एजन्सी बडतर्फ, नांदेड-औरंगाबादचा समावेश

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीज मीटरचे रीडिंग 100 टक्के अचूक झालेच पाहिजे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार विविध एजन्सीने केलेल्या रीडिंगची पडताळणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यानुसार सहा एजन्सीतील कामात दोष आढळला असून त्यांच्यावर आता बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंपन्यांवर महावितरणची कारवाई, राज्यातल्या 6 एजन्सी बडतर्फ, नांदेड-औरंगाबादचा समावेश
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 2:10 PM

औरंगाबादः वीज ग्राहकांच्या घरी जाऊन चुकीचे मीटर रीडिंग घेणाऱ्या कंपन्यांवर महावितरणने (MSEDCL) कठोर कारवाई केली आहे. चुकीचे रीडिंग घेत महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणे आणि वीजबिल (Electricity Bill) दुरुस्तीसाठी ग्राहकांना त्रास देणाऱ्या राज्यातील सहा एजन्सींना महावितरणने बडतर्फ केले आहे. या एजन्सी राज्यातील ग्राहकांच्या घरी जाऊन मीटरचे रीडिंग घेण्याचे काम करत होत्या. कारवाई झालेल्या राज्यातील सहा एजन्सींमध्ये औरंगाबादसह नांदेड (Aurangabad), वसई, पुणे, अकोल येथील एजन्सींचा समावेश आहे. या एजन्सींना बडतर्फ करण्यात आले असून त्यांचे नाव ब्लॅक लीस्टमध्ये टाकण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे.

राज्यातील कोणत्या सहा एजन्सी बडतर्फ?

  • बारामती परिमंडलातील परिमल एंटरप्रायजेस, पांडरे तालुका बारामती (सासवड विभाग) व गणेश एंटरप्रायजेस सादलगाव तालुका शिरूर (केडगाव विभाग)
  • कल्याण परिमंडलमधील सुप्रीम पॉवर सर्व्हिसेस, अंधेरी (वसई विभाग)
  • नांदेड परिमंडलातील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल, दहेली ता. किनवट (भोकर विभाग)
  • औरंगाबाद परिमंडलमधील नंदिनी एंटरप्रायजेस (शहर विभाग 2)
  • अकोला परिमंडलातील अजिंक्य महिला बहुद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था (अकोला शहर विभाग) या सहा एजन्सीद्वारे सुरु असलेल्या मीटर रीडिंगच्या कामाच दोष असल्याचे आढळून आले.

अचूक मीटर रीडिंगसाठी महावितरण आग्रही

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीज मीटरचे रीडिंग 100 टक्के अचूक झालेच पाहिजे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 1 फेब्रुवारीला राज्यभरातील मीटर रीडिंग एजन्सीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. तसेच चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांना होणारा त्रास आणि महावितरणचे नुकसान सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला होता. तसेच विविध एजन्सीने केलेल्या रीडिंगची पडताळणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यानुसार सहा एजन्सीतील कामात दोष आढळला असून त्यांच्यावर आता बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

इतर बातम्या-

VIDEO : Kirit Somaiya हे दलाल, लफंगा आणि चोर, Sanjay Raut यांचा सोमय्यांवर घणाघात

मुगाच्या डाळीचे हे चमत्कारिक फायदे माहीत आहेत? Weight Loss यासह विविध समस्या दूर करण्यास मदत!

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.