Pune | वीज कर्मचाऱ्यांचा फटाके फोडून आनंद साजरा

Pune | वीज कर्मचाऱ्यांचा फटाके फोडून आनंद साजरा

| Updated on: Mar 30, 2022 | 5:30 PM

वीज कर्मचाऱ्यांचा संप (MSEDCL worker strike) मिटल्यानंतर, भोरमधील (Bhor) महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडत आनंद साजरा (Celebration) केला. यावेळी पेढे कर्मचाऱ्यांकडून एकमेकांना पेढे भरविण्यात आले.

वीज कर्मचाऱ्यांचा संप (MSEDCL worker strike) मिटल्यानंतर, भोरमधील (Bhor) महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडत आनंद साजरा (Celebration) केला. यावेळी पेढे कर्मचाऱ्यांकडून एकमेकांना पेढे भरविण्यात आले. विविध मागण्यांसाठी मागचे दोन दिवस वीज कर्मचारी संपावर होते. मात्र वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वसनानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अंधार पसरला (Power Outage) होता. दरम्यान, आता संप मागे घेतला गेल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांचा आनंद यावेळी त्यांनी फटाके फोडून साजरा केला. ज गेल्याने शतकऱ्यांना शेताला पाणी देणे अवघड होऊन बसले होते. तर वीजेच्या तुटवड्यामुळे अनेक उद्योगधंदेही बंद होत होते. तर परीक्षेत वीज नसल्याने अभ्यासाला विद्यार्थ्यांना अडचण येत होती. मात्र आता सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.