Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीत बऱ्याच वर्षांनी सीएनजी लालपरी दाखल, प्रदुषणमुक्त प्रवास आणि डीझेलची बचत

एसटीची पहिली BS - 6 CNG परिवर्तन बस लालपरी महामंडळात दाखल झाली आहे. त्यामुळे आता एसटीचा प्रवास डीझेल एवजी पर्यावरण स्नेही अशी सीएनजी गॅसवर होणार आहे.

एसटीत बऱ्याच वर्षांनी सीएनजी लालपरी दाखल, प्रदुषणमुक्त प्रवास आणि डीझेलची बचत
CNG LALPARIImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 12:39 PM

मुंबई : एसटी महामंडळात बऱ्याच वर्षांनी नवीन कोरी सीएनजी लालपरी ( CNG BS-6 ) बस दाखल झाली आहे. महामंडळाने ( MSRTC ) प्रथमच टाटा कंपनीच्या चासिसवर ( Tata Chassis )  सीएनजी बसेसची बांधणी केली आहे. यापूर्वी सीएनजी बसचा प्रयोग 2009-10 मध्ये झाला होता. परंतू त्यावेळी त्याबसेस सिटी बस म्हणून सुरु करण्यात आल्या होत्या. आता बऱ्याच वर्षांनी एसटी महामंडळात सीएनजी बसेस लांबपल्ल्याच्या मार्गावर धावणार आहेत. त्याची सुरुवात ठाणे आगारातून झाली आहे.

एसटीची पहिली BS – 6 CNG परिवर्तन बस लालपरी महामंडळात दाखल झाली आहे. त्यामुळे आता एसटीचा प्रवास डीझेल एवजी पर्यावरण स्नेही अशी सीएनजी गॅसवर होणार आहे. या बसेस पूर्वी सिटी बस म्हणून साल 2009-10 मध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा सीएनजी बस बीएस-6 मानकांनूसार दाखल होत आहे. या बसची बांधणी माईल्ड स्टीलची असून ही टाटाच्या नव्या चेसिसवर बांधण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरातील ( औरंगाबाद ) चिखलठाणा एमआयडीसी येथील एसटीच्या वर्कशॉपमध्ये या बसेसची बांधणी करण्यात आली आहे. या बसेसची क्षमता 44 प्रवासी इतकी आहे. या बसेसला पॅनिक बटण, सोयीस्कर हॅंडल, आरामदायी आसने देण्यात आली आहेत.

700 चासिस खरेदी

एसटी महामंडळाने टाटा कंपनीच्या 700 चासिस खरेदी केल्या होत्या. त्यापैकी 400 चासिसवर  साध्या डीझेल बसची बांधणी होणार आहे. तर 200 बसेस या हिरकणी गुलाबी रंगाच्या असणार आहेत. तर 50 बसेस या संपूर्ण स्लिपर दर्जाच्या असणार आहेत. तर 50 बसेस या सीएनजीच्या असणार आहेत. दापोडीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत टाटाच्या चासिसवर संपूर्ण 12 मीटर लांबीची स्लिपर कोच बस बांधण्याचे काम सुरु आहे.

130 किलो सीएनजीची क्षमता

या बसेसमध्ये एअर सस्पेन्शन नसल्याने  प्रवाशांना हादरे बसण्याची शक्यता आहे. या बसेसला बसच्या खाली सीएनजीचे पाच सिलेंडर बसविण्यात येणार आहेत. या बसमध्ये 130 वा 135 किलोग्रॅम सीएनजी गॅस भरता येणार आहे. एसटी महामंडळाला रोज 14 लाख लिटर डीझेल लागायचे. केंद्र सरकार महामंडळाला डीझेलची विक्री करताना घाऊक दराचा फायदा सवलत देत नाही. त्यामुळे इतर बल्कमध्ये डीझेल घेऊनही ते महाग पडते. आता सीएनजी आणि येऊ घातलेल्या पाच हजार इलेक्ट्रीक बसेसमुळे इंधनाची बचत होणार आहे.

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.