ST Bus | प्रवाशांच्या सेवेत येणार नव्या रुपातील ‘हिरकणी’, आता प्रवास होणार आरामदायक !

महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सेवेत लवकरच नवीन हिरकणी बस दाखल होणार आहे. या बसमध्ये प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येणार आहे. पुण्यात दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत या बसेस तयार केल्या जात आहेत.

ST Bus | प्रवाशांच्या सेवेत येणार नव्या रुपातील 'हिरकणी', आता प्रवास होणार आरामदायक !
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 8:50 PM

मुंबई ( अतुल कांबळे ) :  ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानली जाणारी एसटी बस कोरोनाकाळानंतर आता पुन्हा भरारी घेत आहे. आताज आरामदायी प्रवासासाठी साध्या बसेसना देखील ‘पुश बॅक’ सीट बसविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बसेस ‘एअर सस्पेन्शन’ तंत्रज्ञानाच्या असल्याने प्रवासात प्रवाशांना धक्के बसणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली.

एसटी महामंडळात बराच काळ नवीन गाड्यांची खरेदी झाली नसल्याने जुन्या गाड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने २,७०० गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाकाळ आणि एसटीचा लांबलेला संप यामुळे नवीन गाड्यांची खरेदी बंद होती. आता एसटीने स्व-मालकीच्या दोन हजार गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीच्या पुणे येथील दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत बस बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. दापोडी, हिंगणा ( नागपूर), चिकलठाणा ( संभाजीनगर ) अशा तीन कारखान्यात एसटी गाड्यांची बांधणी सुरू आहे. दापोडी कारखान्यात ७०० बसेसची बांधणी सुरू आहे. येथे निमआराम श्रेणीच्या २०० हिरकणी ( एशियाड ), आरामदायी श्रेणीच्या ५० नॉन एसी स्लीपर, ५० सीएनजी, ५०० लालपरी साध्या बसेस अशा ७०० बसेसची बांधणी सुरू आहे.

st bus

दापोडी कारखान्यातून ५०० साध्या बसेसपैकी १४३ बसेस बांधून बाहेर पडल्या आहेत. उरलेल्या साध्या बसेसना आता आरामदायी ‘पुश बॅक’ सीट बसविण्यात येणार आहेत. या बसेस जून २०२३ पर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेस ॲल्युमिनियम ऐवजी माईल्ड स्टील ( एम‌एस ) बॉडीच्या आहेत. तसेच त्यांच्यात स्प्रिंग ऐवजी ‘एअर सस्पेन्शन’ तंत्रज्ञानाचा वापर असल्याने प्रवासात धक्के बसणार नाहीत अशी माहिती कार्यशाळा व्यवस्थापक दत्तात्रय चिकोर्डे यांनी दिली. इंदिरा गांधी यांनी केले होते कौतुक..!

एसटीने आपला लोकप्रिय ब्रँड ‘हिरकणी’ पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आशियाई खेळांसाठी १९८२ मध्ये बनविण्यात आल्या होत्या. दिल्ली येथे एशियाड खेळाडूंची ने आण करण्याकरिता या बस वापरल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या एशियाड बसचे कौतुक केले होते. हीच एशियाड बस नंतर दादर-पुणे मार्गावर चालविण्यात आली होती. तिचे नामकरण नंतर ‘हिरकणी’ असे केले गेले. अशा २०० स्टील बांधणीच्या नव्या रुपातील हिरकणी बसेस दापोडीमध्ये बांधल्या जात आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.