एमटीडीसीचा अनोखा उपक्रम, पर्यटकांसमोर मोटोहोम कॅम्परवॅनचा नवा पर्याय 

आज (6 सप्टेंबर) एमटीडीसीमार्फत अनोख्या अशा मोटोहोम कॅम्परवॅनचा शुभारंभ करण्यात आला. (MTDC Started Motorhome caravan vehicles for Tourism)

एमटीडीसीचा अनोखा उपक्रम, पर्यटकांसमोर मोटोहोम कॅम्परवॅनचा नवा पर्याय 
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 10:02 PM

मुंबई : कोरोना संकटामुळे परिणाम झालेल्या पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर पुनुरुज्जीवीत करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुढाकार घेतला आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज (6 सप्टेंबर) एमटीडीसीमार्फत अनोख्या अशा मोटोहोम कॅम्परवॅनचा शुभारंभ करण्यात आला. (MTDC Started Motohome caravan vehicles for Tourism)

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

एमटीडीसीने सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे पर्यटकांना आपल्या आरोग्याची काळजी घेत अतुलनीय महाराष्ट्रातील सौंदर्य पाहता येणार आहे. लॉकडाऊनदरम्यान आणि त्यानंतर प्रवासाच्या योजनांसाठी कॅम्परवॅन हा एक प्रभावी उपाय आहे. पर्यटक कॅम्परव्हॅन भाड्याने घेऊ शकतात किंवा एकामध्ये गुंतवणूक करू शकतात.

हॉटेल्स बुक न करता प्रवास करू शकतात किंवा रेस्टॉरंट ब्रेकसाठी ठेवण्याची गरज नाही. या व्हॅनमध्ये स्वयंपाकघर, एक मिनी बेडरूम, लिव्हिंग रूम, मूलभूत सुविधा आणि टेरेससारख्या सुसज्ज सुविधा आहेत. ज्यामुळे पर्यटकांना घरापासून दूर एक सर्वसोयीयुक्त घराची सुविधा उपलब्ध होते.

मोटोहोम वाहनांमध्ये कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था आहे. त्यामुळे सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छता सुनिश्चित केली जाते. कोव्हिड-19 महामारीविरुद्ध संपूर्ण जग लढत असताना महाराष्ट्रात हा उपक्रम सुरु करून पर्यटन क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी एमटीडीसी ठोस आणि सकारात्मक पाऊल उचलत आहे.

ज्यांना स्वतंत्रपणे फिरायचे आहे आणि महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेट देऊन महाराष्ट्राचे सौंदर्य पाहायचे आहे, त्यांना उत्कृष्ट प्रवासाची सोय आणि पर्यटनस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणि पर्यटन विभाग महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक नकाशावर आणून जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले. (MTDC Started Motohome caravan vehicles for Tourism)

संबंधित बातम्या : 

प्रॅक्टीकल ऐवजी तोंडी परीक्षा, अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 3 पर्याय, विद्यापीठांना निवडीचे स्वातंत्र्य

एपीएमसीतील मुख्यलेखाधिकाऱ्यांसह सहकाऱ्याला कोरोना, एपीएमसीची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.