MUKESH AMBANI | मुकेश अंबानींचा ‘तो’ भाऊ, ज्याच्या सुनेने 15,000 कोटींच्या अँटिलियाजवळ घेतले महागडे घर
अँटिलियाजवळचा परिसर हा भारतातील सर्वात महागड्या भागांपैकी एक मानला जातो. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय येथे राहतात. अँटिलियाची किंमत सुमारे 15,000 कोटी रुपये आहे.
नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची दिग्गज उद्योगपती आनंद जैन यांच्याशी दीर्घकाळापासून मैत्री आहे. ही मैत्री इतकी घट्ट आहे की, अनिल अंबानी नंतर मुकेश अंबानी हे आनंद जैन यांना आपला ‘दुसरा’ भाऊ मानतात. आनंद जैन हे एकेकाळी देशातील 40 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11 व्या स्थानी होते. नवोदित उद्योजक हर्ष जैन यांचे ते वडील आहेत. हर्ष जैन हे ड्रीम 11 चे संस्थापक आहेत. काल्पनिक क्रीडा मंच असलेले हे ड्रीम 11 याची किंमत 8 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. हर्ष जैन याची पत्नी रचना ही डेंटिस्ट आहे. या दोघांनी अँटिलियाजवळ ड्युलेक्स अपार्टमेंट घेतले आहे.
मुकेश अंबानी यांचा भाऊ अनिल यांच्याबद्दल लोकांना माहिती आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांचा ‘दुसरा भाऊ’ आनंद जैन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. उद्योगपती आनंद जैन हे मुकेश अंबानी यांना भावासारखे आहेत. शालेय जीवनापासून त्यांची मैत्री आहे.
आनंद अजिन यांचा मुलगा हर्ष याचे Dream11 हे भारतातील आघाडीचे ‘युनिकॉर्न’ आहे. हर्ष आणि त्याची पत्नी रचना यांनी 2013 मध्ये लग्न केले. हर्ष जैन यांच्या ड्रीम 11 साठी एमएस धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, शिखर धवन आणि इतर अनेक क्रिकेटपटूंनी जाहिरात करण्यासाठी भागीदारी केली आहे.
मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब भारतातील सर्वात महागड्या घरात अँटिलियामध्ये राहतात. त्याची किंमत 15000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अँटिलियाजवळचा परिसर हा भारतातील सर्वात महागड्या भागांपैकी एक मानला जातो. याच परिसरात हर्ष जैन यांच्या पत्नीने 72 कोटी रुपयांचे डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. या जोडप्याचे नवीन घर 29 व्या आणि 30 व्या मजल्यावर आहे.
व्यवसायाने रचना जैन या डेंटिस्ट आहेत. या जोडप्याला क्रिश नावाचा मुलगा आहे. हर्ष जैन 65,000 कोटी रुपयांची ड्रीम 11 कंपनी स्थापन करण्यासाठी पत्नीने पाठींबा दिल्याचे उघडपणे सांगतात. आपल्या या यशामागे रचना ही अदृश्य शक्ती असल्याचे त्यांनी ट्विटही केले आहे.