Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का… 4500 रुपये विसरा, मिळणार फक्त… मोठी अपडेट काय?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिला इच्छुक असून अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. याचदरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील बदलाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का...  4500 रुपये विसरा, मिळणार फक्त... मोठी अपडेट काय?
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 1:03 PM

राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेचआत्तापर्यत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे. मात्र याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार आहे. पण ज्या महिला ही तारीख चुकवतील,1 सप्टेंबर नंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना या 3 हजार रुपयांना मुकावे लागणार आहे, असे अदिती तटकरे यांनी नमूद केले. यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे,असेही त्यांनी सांगितलं.

31 ऑगस्टपूर्वी अर्ज केला नसेल तर…

हे सुद्धा वाचा

लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती, त्या तारखेनंतरही ज्या महिला अर्ज भरतील, नाव नोंदणी करतील त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळले, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषण करत 1 जुलैपासून ती लागू होईल असे जाहीर केले होते. या योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यभरातून 2 कोटी 40 लाख महिलांचे र्ज आले असून पुण्यातून सर्वाधिक अर्ज आल्याची महिती समोर आली आहे. सरकारने या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता ( जुलै आणि ऑगस्ट महीना) हा ऑगस्ट महिन्यात जमा केला. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाले. सुमारे 14 लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत.

ज्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, त्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. बँक अकांऊटशी आधार कार्ड लिंक केल्यावरच खात्यात पैसे जमा होणार आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.