बाब्बो… ‘लाडक्या बहिणी’चे पैसे चक्क तरुणाच्या खात्यात जमा; महाजन म्हणतात, पण कौतुक…

राज्य सरकारने गोरगरीब महिलांना हातभार लावण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिलांना तीन हजार रुपये देण्यात येत आहेत. दोन हप्ते म्हणून ही रक्कम दिली जात आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमाही झाले आहेत. मात्र, यवतमाळमध्ये एक उफराटा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बाब्बो... 'लाडक्या बहिणी'चे पैसे चक्क तरुणाच्या खात्यात जमा; महाजन म्हणतात, पण कौतुक...
'लाडक्या बहिणी'चे पैसे चक्क तरुणाच्या खात्यात जमा
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 1:24 PM

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना वाजतगाजत सुरू केली आहे. या योजनेचे गेल्या दोन दिवसांपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे. आज तर सर्वच महिलांच्या खात्यात दोन हप्ते आले आहेत. रक्षाबंधन असल्यामुळे सरकारने एकदमच दोन हप्ते देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही रक्कम आली आहे. त्यामुळे महिला वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. सरकारच्या या योजनेचं कौतुकही केलं जात आहे. पण फक्त महिलांसाठीच असलेल्या या योजनेचे पैसे चक्क एका तरुणाच्या खात्यावर जमा झाले आहे. प्रशासनाच्या डुलक्यांमुळे हा प्रकार घडला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील हाफिज बेग नगरात हा प्रकार घडला आहे. हाफिज बेग नगरमध्ये राहणाऱ्या जाफर गफार शेख या तरुणाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत. जाफर हा सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याचं बँक ऑफ बडोदामध्ये खातं आहे. पण त्याच्या खात्यात पैसे आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

चौकशी करा

धक्कादायक बाब म्हणजे जाफरने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नव्हता. कोणतीही कागदपत्र जमा केली नव्हती. तरीही त्यांच्या खात्यात सरकारने तीन हजार रुपये पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सरकारच्या या भोंगळ कारभारावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकाराचं स्वत: जाफरलाही आश्चर्य वाटलं आहे. योजनेचे पैसे बँकेत जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे महिलांना तसा मेसेजही येत आहे. मलाही योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला होता. त्यामुळे मी यवतमाळला जाऊन बँकेत चेक केलं असता माझ्या अकाऊंटमध्ये तीन हजार रुपये आले होते. मी कोणताही अर्ज भरला नव्हता. कोणतीही कागदपत्र जमा केले नव्हते. तरीही माझ्या खात्यात पैसे आल्याने मलाच त्याचं आश्चर्य वाटतंय. या प्रकाराची सरकारने चौकशी केली पाहिजे, असं जाफरचं म्हणणं आहे.

महिलांना अजूनही पैसे नाही

अनेक महिलांनी गर्दीत रेटारेटी करुन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची धावपळ सुरु होती. मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाही. पण जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या कारभाराबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

महाजन काय म्हणाले?

दरम्यान, सरकारच्या या भोंगळ कारभारावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तांत्रिक अडचण असू शकते. त्यामुळे हे झाले असेल. एका तरुणाला पैसे गेले म्हणून तुम्ही बातम्या करता, पण एक कोटी भगिनींना पैसे गेले आहेत याच आपण कौतुक केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.