महामार्गावरचा गतिरोधक ठरला जीवघेणा; अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याने मुंबई-गोवा महामार्ग तासभर रोखला

| Updated on: May 18, 2022 | 3:59 PM

नांदगाव उड्डाणपूल येथे कालच सायंकाळी गतिरोधक बांधण्यात आला होता, मात्र गतिरोधकावर लाल रंगाचे रिफ्लेक्टर बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे आणि गतिरोधक नवीनच असल्यामुळे दुचाकी चालवणाऱ्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा अपघात होऊन पाठीमागे बसलेली एक महिला गाडीवरुन फेकली गेली.

महामार्गावरचा गतिरोधक ठरला जीवघेणा; अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याने मुंबई-गोवा महामार्ग तासभर रोखला
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातच महिल ठार
Follow us on

सिंधुदुर्गः मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक संतप्त झाले आहे. नांदगाव येथे नवीन गतिरोधक बांधण्यात आला होता, या गतिरोधकामुळे दुचाकीचा अपघात (Nandgaon Accident) होऊन महिला जागीच ठार झाली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू (Death of woman) झाल्याने येथील नागरिकांनी संतप्त होत, मुंबई-गोवा महामार्गावर रास्तारोको करून रात्री महामार्ग रोखून धरला होतो. नागरिकांनी रास्तारोको केल्यामुळे तब्बल पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळे तब्बल एक तासानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

काल बांधला अन् आज अपघात

नांदगाव उड्डाणपूल येथे कालच सायंकाळी गतिरोधक बांधण्यात आला होता, मात्र गतिरोधकावर लाल रंगाचे रिफ्लेक्टर बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे आणि गतिरोधक नवीनच असल्यामुळे दुचाकी चालवणाऱ्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा अपघात होऊन पाठीमागे बसलेली एक महिला गाडीवरुन फेकली गेली.

महामार्गावर गतिरोधक चुकीच्या पद्धतीने

दुचाकीवरुन फेकली गेल्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, या अपघातात दुचाकीस्वारही पडल्याने तो जखमी झाला आहे. हा अपघात महामार्गावर गतिरोधक चुकीच्या पद्धतीने तयार केल्यामुळे झाला असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता.

अपघात कमी कधी होणार

मुंबई-महामार्ग हा नेहमीच वर्दळीचा आणि गजबजलेला असतो, पावसाळ्यातही या महामार्गावरुन अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे अनेक वेळा या महामार्गाविषयी तक्रारही करण्यात आली आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

नागरिकांचा रास्तारोको

काल झालेला अपघातही प्रशासनाची चूक असल्यामुळेच हा अपघात झाला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. गतिरोधक तयार होऊन त्यावर कोणत्याही सूचना अथवा रिपेलेक्टर बसवण्यात आले नाहीत, त्यामुळे येथीन नागरिकांनी प्रशासनाल जबाबदार धरत अपघातानंतर रास्तोरोको करत प्रशासनाविषयी निषेध नोंदवण्यात आला.ज्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.