आजी म्हणाली होती, गणपती येईस्तोवर थांबते, सोनाली कुलकर्णीची भावूक पोस्ट…

सोनाली कुलकर्णी हिने या फेसबुक पोस्टमध्ये आजीसोबतचे फोटो शेअर केलेत. तसेच मागील वर्षी तिने आणलेल्या लाडक्या बाप्पाचेही फोटो शेअर केले आहेत. गणेशभक्तांना तिने शुभेच्छाही दिल्या आहेत.

आजी म्हणाली होती, गणपती येईस्तोवर थांबते, सोनाली कुलकर्णीची भावूक पोस्ट...
सोनाली कुलकर्णीने फेसबुकवर आजीसोबतचा फोटो शेअर केलाय.. Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 6:01 PM

मुंबईः लाडक्या बाप्पाशी मुंबईकरांचं (Mumbai) विशेषतः सेलिब्रेटींचं अगदी जवळचं नातं आहे. अनेक मोठ-मोठ्या अभिनेत्यांच्या घरी आज थाटा-माटात गणरायाचं आगमन झालंय. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) आज गणपती बसवलाच नाही. यंदाच्या वर्षी त्यांच्या घरी गणपती का बसवला नाही, याचं कारणही तिने जाहीर सांगितलंय. सोनाली कुलकर्णीने यासंदर्भात टाकलेली एक फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होतेय. सोनाली कुलकर्णी हिच्या आजीचं काही दिवसांपूर्वीच निधन झालंय. आजीच्या आठवणीने या वर्षी गणपती बसवायचाच नाही, असे त्यांच्या कुटुंबियांनी ठरवलं आहे.

सोनाली कुलकर्णीची पोस्ट काय?

सोनाली कुलकर्णीने आज दुपारीच एक पोस्ट टाकलीय. त्यात तिने सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्यात. तसंच एवढ्या वर्षात आम्ही पहिल्यांदाच गणपती बसवणार नाहीयोत, असं म्हटलंय. कारण आजी म्हणाली होती, मी गणपती येईस्तोवर थांबते, पण…. (दरम्यानच्या काळात सोनाली कुलकर्णी यांच्या आजीचं निधन झालंय. )

Sonali 2

हे सुद्धा वाचा

आजी लाडक्या बाप्पाकडे गेली…

सोनालीने पुढे लिहिलंय, निदान त्या शारीरिक वेदनांतून तिची सुटका झाली. ती जिथे कुठे असेल शांत, समाधानी, आनंदी असेल. असं वाटतंय. माझी लाडकी आजी आता माझ्या लाडक्या बाप्पाकडेच गेलीये…

पुढच्या वर्षी तुझ्या मनासारखा…

या पोस्टमध्ये सोनाली कुलकर्णीने पुढच्या वर्षी मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं म्हटलंय. ती लिहिते, आजी पुढच्या वर्षी, तू शिकवलंयस तसा, नेहमीप्रमाणे.. तुझ्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करू…

Sonali 3

आजीसोबतचे फोटो शेअर केले…

सोनाली कुलकर्णी हिने या फेसबुक पोस्टमध्ये आजीसोबतचे फोटो शेअर केलेत. तसेच मागील वर्षी तिने आणलेल्या लाडक्या बाप्पाचेही फोटो शेअर केले आहेत. गणेशभक्तांना तिने शुभेच्छाही दिल्या आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.