मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला. तसंच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी रुग्णालात जात संताप व्यक्त केला. रुग्णालय प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या सगळ्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. गेले काही महिन्यापासून महामालिकेच्या दवाखान्यात देखील औषध खरेदीचे प्रश्न आले आहेत. कारण त्या ठिकाणी औषधं नसतात. राज्यात सर्वच क्षेत्रांमध्ये परिस्थिती बिकट आहे. आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, उद्योग क्षेत्र असेल एकंदरीत कारभार हा कोलमडलेला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
जिथे जिथे कोणी भाजपच्या वाशिंग सेंटरमध्ये गेले नाही. त्यांना नोटीस येतात. त्यामुळे ते नेते भाजपसोबत जातात. हे आता जग जाहीर आहे. देशात नाही जगात कोणालाही विचारलं तर सर्वांना माहिती आहे. सगळे भ्रष्ट लोक एका बाजूला सत्तेत बसलेले आहेत. जे येत नाही त्यांना नोटीस पाठवतात, असं म्हणत जयंत पाटलांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. त्यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर मी काय सांगू शकतो? मी माझ्या पक्षाच्या भेटीवर सांगू शकतो. मात्र आम्ही जे घेऊन चाललेलो आहे. इंडियाची बैठक पाहिली तर देशभरात एक वातावरण बनत आहे. जे जे आता सत्तेत बसलेले आहेत. जी हुकूमशाहीची राजवट चालू आहे. त्याच्या विरोधात जनता लढायला लवकर रस्त्यावर येत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यामध्ये नक्की पॉवर सेंटर सरकारमध्ये कुणाकडे आहे आणि सरकारच्या आत का सरकारच्या बाहेर? कारण सध्या सरकार चालतं आहे की नाही हा प्रश्न झालेला आहे.अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ते यासाठीच उपस्थित होत आहे की जे घोटाळे महाराष्ट्र मध्ये सुरू आहे. महानगरपालिकेत पैशाची लूट सुरू आहे. काल खड्ड्यांवर पाच महानगरपालिकाला हायकोर्टाने झापले आहे ही परिस्थिती बिकट झालेली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.