विद्यावाचस्पती नको, डॉक्टरच शब्द ठीक आहे, मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमात Ajit Pawar यांची टोलेबाजी
मुंबई | चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्यावरच तोंडसुख घेतले. मराठी भाषेसाठीच्या याcमंत्र्यांच्या बोर्डावरच डॉक्टर असा शब्द लिहिलाय. आता डॉक्टर (Doctor) म्हटले की दोन अर्थ होतात. वैद्यकीय डॉक्टर आहेत की संशोधनातले? याचा बोध होत नाही. मला माहितीय त्यांनी […]
मुंबई | चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्यावरच तोंडसुख घेतले. मराठी भाषेसाठीच्या याcमंत्र्यांच्या बोर्डावरच डॉक्टर असा शब्द लिहिलाय. आता डॉक्टर (Doctor) म्हटले की दोन अर्थ होतात. वैद्यकीय डॉक्टर आहेत की संशोधनातले? याचा बोध होत नाही. मला माहितीय त्यांनी मॅनेजमेंटमध्ये डॉक्टरकी केली आहे. मराठीचा आग्रह धरायचाच असेल तर त्यांनी आपल्या नावासमोर विद्यावाचस्पती विश्वजित असं लिहायला पाहिजे. पण हे विचित्र वाटेल म्हणून तुझ्यासाठी आम्ही परवानगी देतो…. असं म्हणून गंमतीचा भाग सोडून मराठीचा आग्रह खरोखरीच धरला पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
मराठी भाषेचा प्रवास हा प्रत्येक घराचा
या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, ‘ मराठी भाषेचा विकास हा प्रत्येक माणसाचा प्रवास आहे. मराठी भाषा ही एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत चालत आलेली आहे आणि यापुढेही ती अशीच प्रवास करत राहील. मराठी भाषेचा हा प्रवास पाहिल्यानंतर कुणी कितीही म्हटलं तरी मराठी भाषा संपणार नाही. महाराष्ट्राच्या घरा-घरात जन्माला येणारी नवीन पिढी आपली मराठी भाषा अभिमानानं पुढे घेऊन जाईल.जगाच्या अंतापर्यंत मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जीवंत राहील, अशी सर्वांना खात्री आहे. आज गुढीपाडव्याच्या दिवशी ही एक चांगली सुरुवात आहे. मराठी भाषेची गुढी अशीच उंच उभी राहो, अशी शुभेच्छा मी देतो…’
सर्वाधिक बोलली जाणारी जगातील दहावी भाषा
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मराठी भाषा ही सर्वाधिक बोलली जाणाऱ्या दहा भाषांपैकी दहावी भाषा आहे. देशात तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. या भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळावा, असा आपला निर्धार आहे. यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. आपले सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई केंद्रीय मंत्र्यांना यासाठी भेटले. केंद्रीय मंत्र्यांनीही याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. पण हा लढा निर्णायक ठरवण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. आपली भाषा अभिजात राहून चालणार नाही, तर बहुजात आणि बहुज्ञात व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करू, असे अजित पवार यांनी म्हटले.
‘मराठी ही उद्योगांची भाषा व्हावी’
कोणत्याही देशाचा विकास हा भाषेच्या विकासावर अवलंबून असतो. त्यामुळे मराठी आपल्याकडील उद्योगांची भाषा व्हावी, ही भाषा बोलणाऱ्यांना मराठीनं रोजगार निर्माण करून द्यावा, असे आपले प्रयत्न असावेत, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. दोन अनोळखी मराठी भाषिक बोलले तर ते आधी इंग्रजीत बोलतात, मग अडखळतात, हिंदीवर येतात आणि नंतर मराठीत बोलतात. आपली भाषा बोलण्यासाठीचा हा न्यूनगंड सोडला पाहिजे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
इतर बातम्या-