मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
All Party MLA protest outside of Mantralaya For Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदार आक्रमक झाले आहेत. मंत्रालयाबाहेर या आमदारांनी आंदोलन केलं आहे. आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी या आक्रमक झालेल्या या आमदारांनी घोषणाबाजी केली.
अक्षय मंकणी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी मुंबई | 01 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न आता पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलनं उपोषणं होत आहेत. अशातच मुंबईत मंत्रालयाच्या गेटवर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आमदार आंदोलन करत होते. या आमदारांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी हे आमदार आक्रमक झाले. आम्ही आमच्या समाजासाठी भूमिका घेत आहोत. यात चुकीचं काय आहे? आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा आरक्षण द्या, असं हे आमदार म्हणाले. यावेळी या आमदारांनी घोषणाबाजी केली. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या.
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन केलं.मंत्रालयाला या आमदारांनी कुलुप लावण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी या आमदारांनी केली. आंदोलन करणाऱ्या या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा यावेळी या आमदारांनी दिल्या. आज आम्हाला उचलत आहात. पण उद्या परत आंदोलनाला बसणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं यावेळी हे आमदार म्हणाले.
मंत्रालयालयात मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या आमदारांना आझाद मैदानातील पोलीस चौकीत आणण्यात आलं आहे. या आमदारांनी काल गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं होतं. तसंच राज्यपालांची देखील भेट घेतली होती. आज मंत्रालयात आंदोलन करत असताना या आमदारांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना आझाद मैदानातील चौकीत आणण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक होत आहे. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल यावर चर्चा केली जात आहे. त्यामुळे या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे.
आरक्षणाचा मुद्दा आता अधिक तीव्र होत चालला आहे. मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावते आहे. अशात मराठा समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनं केली जात आहेत. त्यामुळे सरकार आरक्षणाबाबत निर्णय घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल.