मुंबई APMC धान्य मार्केट एक दिवसीय बंदमुळे डाळ व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना करोडोंचे नुकसान
तर आजच्या बंदने मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागल्याची माहिती ग्रोमाचे सेक्रेटरी भीमजी भानुशाली यांनी दिली आहे.
नवी मुंबईः मुंबई APMC धान्य आणि मसाला मार्केट मधून दिवसात जवळपास 60 ते 70 हजार क्विंटल कडधान्य मुंबई आणि उपनगरात विकले जाते. एक दिवसात बंदमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल आज थांबली. तर आजच्या बंदने मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागल्याची माहिती ग्रोमाचे सेक्रेटरी भीमजी भानुशाली यांनी दिली आहे.
7 हजार बाजार समित्या आणि 12 हजार गिरणी आपला व्यवसाय बंद
शिवाय भारतीय उद्योग व्यापार संघटनेच्या आवाहलानुसार 16 जुलै 2021 रोजी 7 हजार बाजार समित्या आणि 12 हजार गिरणी आपला व्यवसाय बंद ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. घाऊक विक्रेत्यांसाठी साठवणूक मर्यादा 200 मे.टन (ज्यामध्ये विविधतेसाठी 100 मे.टन) निश्चित करण्यात आली आहे. तर किरकोळ विक्रेते यांना 5 मे. टन करण्यात आली होती. यावर देशभरातील डाळ व्यापाऱ्यांनी यानियमाविरोधात बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
धान्य बाजारपेठ बंद झाल्यामुळे 80 लाख लोकांवर परिणाम
देशातील 7 हजार धान्य बाजारपेठ बंद झाल्यामुळे 80 लाख लोकांवर परिणाम झाला. ज्यामध्ये व्यवस्थापक, लेखापाल, सहाय्यक कर्मचारी, गुमस्ता आणि सर्व प्रकारच्या मजुरांचा समावेश आहे. देशातील 12 हजार गिरण्याही त्यांचा व्यवसाय बंद ठेवले होते. याचा परिणाम 12 लाख लोकांवर झाली आहे. ज्यामध्ये ऑपरेटर, सहाय्यक ऑपरेटर, नाडी सफाई कामगार, व्यवस्थापक, पुस्तकेदार इत्यादींचा समावेश असेल.
सुमारे 42 हजार कोटींच्या व्यवसायावर परिणाम
7 हजार मंडी बंद पडल्यामुळे सुमारे 42 हजार कोटींच्या व्यवसायावर परिणाम झाली आहे. 840 कोटी रुपयांच्या व्यापाऱ्यांचा नफा कमी होण्याचीही शक्यता आहे.तसेच या बंदमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सुमारे 1 हजार 680 कोटी रुपयांच्या महसुलाची तोटा होईल. तसेच 12 हजार डाळी गिरण्या बंद पडल्यामुळे सुमारे 12 हजार कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची सांगण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या डाळी गिरण्यांचा 200 कोटी रुपयांचा नफा आणि 60 हजार 600 कोटी रुपयांचा महसूल तोटा होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय उद्योग व्यपार मंडळाचे चेयरमॅन बाबूलाल गुप्ता यांनी दिली.
संबंधित बातम्या
Mumbai APMC grain market one-day closure causes loss of crores to farmers including dal traders