गणेशोत्सव हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात, आणि विदेशातंही उत्साहाने साजरा करण्यात येतो. मात्र आता यांसदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात POP मूर्तींना बंदी असणार आहे. माघी गणेशोत्सवाप्रमाणे आगामी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील कोर्टाच्या नियमांचे सावट आहे. कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. सार्वजनिक उत्सव सन २०२५ पर्यावरणपूरक पध्दतीने तसेच सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने, मूर्तीकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता आणि विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शनाकरिता सूचना करण्यात आल्या आहेत. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा असं बीएमसी कडून सांगण्यात आलं आहे.
सार्वजनिक उत्सव हा पूर्णपणे पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात POPच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी असेल असं त्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या परिपत्रकानंतर आगामी काळात राजकीय नेते, मूर्तीकार तसेच गणेशोत्सव मंडळांची यावर काय भूमिका असेल ते पाहणं महत्वाचं ठरेल. कारण माघी गणेशउत्सव काळात POP च्या मूर्त्या असल्याने तलावात विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. यावरून मुंबई उपनगरात मंडळानी निषेध केला होता. कोर्टाच्या नियमांचे पालन करूनच मूर्ती घडवावी असे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत. आताही हाच निर्णय असल्याने आगामी काळात त्यांच्या भूमिकांकडे सर्वांच लक्ष असेल.
परिपत्रकातील नियम कायम ?