बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थवर राडा; आज परिस्थती काय?

Balasaheb Thackeray Smrutidin : काल शिंदे गट आणि ठाकरे गट भिडले... बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थवर राडा आज शिवाजीपार्कवर काय स्थिती? पोलीस बंदोबस्त कसा आहे? बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कशी व्यवस्था करण्यात आली आहे? वाचा सविस्तर...

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थवर राडा; आज परिस्थती काय?
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 3:28 PM

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदन आहे. त्यानिमित्त राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थवर येत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आहेत. अशातच काल ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राडा झाला. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ हा प्रकार घडला. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. अशात आज शिवतीर्थवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. शिवाजीपार्क परिसराला छावणीचं स्वरूप आलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटात झालेल्या राड्यानंतर शिवाजी पार्क परिसरात आज मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक शिवाजी पार्कमध्ये तैनात आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्कवर येणार आहेत.

शिंदे गट- ठाकरे गट आमने सामने

मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मोठा राडा झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिवस आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जावून बाळासाहेबांना अभिवादन केलं. एकनाथ शिंदे बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहून निघून गेल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर मोठा राडा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमनेसामने आले.

आज दोन्ही गट आमने सामने येऊ नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाची कसोटी आहे. शिवाजी पार्क स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या समोरील गेटवरून नेते उपनेते यांना दर्शनासाठी सोडण्यात येईल. तसंच शिवसैनिकांना समर्थ व्यायाम शाळेजवळून सोडण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाला मदत करण्याचं शिवसेनेकडून आवाहन करण्यात आलं आहे. काल दोन्ही गटात राडा झाल्यानंतर आज इथे काय घडतं याकडं सर्वांचं लक्ष आहे. दोन्ही गटात हाणामारी होऊन देखील अजून पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. काल घटनास्थळी नक्की काय झालं होतं याविषयीचे फुटेज पोलीस प्रशासनाकडून तपासलं जाऊ शकतं.

डीसीपी मनोज पाटील यांनी शिवाजी पार्कवरच्या या राड्यावर प्रतिक्रिया दिली. काल राडा झाला त्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. आज येणाऱ्या शिवसैनिकांना आवाहन आहे की, या ठिकाणाचं गांभीर्य लक्षात घ्यावं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून काळजी घ्या. तसंच आज या ठिकाणी जास्त पोलीस बंदोबस्त यार ठिकाणी तैनात असेल, अशी माहिती मनोज पाटील यांनी दिली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.