उपमुख्यमंत्रिपद नव्हे तर ‘या’ कारणासाठी भाजपसोबत गेलो; अजित पवारांचा मोठा खुलासा

DCM Ajit Pawar on Why did he go with BJP : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? याची राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रभर चर्चा होते. यावर अजित पवार यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार या मुद्द्यावर बोलते झाले. वाचा सविस्तर...

उपमुख्यमंत्रिपद नव्हे तर 'या' कारणासाठी भाजपसोबत गेलो; अजित पवारांचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 7:19 PM

भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष… मात्र सध्या हे दोन्ही पक्षांची युती आहे. अजित पवार यांनी शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याआधी भाजपवर कडाडून टीका करणारे अन् नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांवर टीका करणारे अजित पवार अचानकपणे महायुतीत कसे गेले? नक्की कोणत्या मुद्द्यावर अजित पवारांनी भाजपसोबत राजकीय मैत्रीचा हात पुढे केला? याची वारंवार चर्चा होत असते. आज टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं.

भाजपसोबत का गेले?

आमची विकासाची कामं करण्यासाठी राज्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राचा निधी आणण्यासाठी भाजपसोबत गेलो. देश पातळीवर टाकली तर दोन तीन लोकांची नावे पंतप्रधानपदाची नावे सांगा. ती सांगा. एक मोदी साहेब आहेत. समोरून नाव येत नाही. अनेकदा एकत्र बसले. म्हणतात नंतर ठरवू. आपण कुणाच्या हाती सूत्रे देणार आहोत हे जनतेला कळायला नको, असं टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवार यांनी म्हटलं.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्रीपदाबाबत सांगतो आमच्या आमदारांची मानसिकता विकासासाठी सरकारसोबत गेलं पाहिजे अशी भूमिका घेतली. देशपातळीवर मोदींसारखा नेता पाहायला मिळत नाही. पूर्वी नेते पाहायला मिळायचे. नितीश कुमार यांना मर्यादा आहे. ममता बॅनर्जी या बंगालपुरत्या आहे. केजरीवाल हे दिल्ली पंजाब पुरते आहे. त्यांना गोव्याने स्वीकारलं नाही. चंद्राबाबू आंध्रात समाधानी आहे. फारूख अब्दुल्ला जम्मू काश्मीरपर्यंत मर्यादित आहे. मी मोदींकडे बघून निर्णय घेतला. ते विकास पुरुष आहे. मीही आधी टीका केली. पण टीका करून प्रश्न सुटत नसतात. जनतेचे प्रश्न सोडवताना मजबूत सातत्याने काम करणारे व्यक्ती म्हणून मोदींचं नाव येतं, असं अजित पवारांनी सांगितलं.

‘त्या’ विधानावर अजित पवार ठाम

दुसऱ्या व्यक्तीच्या पोटी जन्माला आलो, त्यात चूक काय? असं विधान अजित पवार यांनी काही दिवसांआधी केलं होतं. यावर अजित पवारांना विचारण्यात आलं तेव्हा मला त्यावेळी जे योग्य वाटलं ते मी केलं. माझ्या मनात जे येतं ते बोलतो. त्यावेळी मला बोलावसं वाटलं तेव्हा मी बोललो. त्याचा अर्थ कसा काढावा हा ज्याचा त्याचा अधिकार. माझ्या मनात आलं. मी बोललो. विषय संपला, असं अजित पवार म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.