मुंडेसाहेबांचं नाव जरी घेतलं तरी…; गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी धनंजय मुंडे यांची भावूक पोस्ट
Dhananjay Munde on Gopinath Munde Jayanti : अप्पा, तुम्ही सदैव स्मरणात आहात...; गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी धनंजय मुंडे यांची भावूक पोस्ट... धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? पंकजा मुंडे यांचं गोपीनाथ मुंडे समर्थकांना काय आवाहन आहे? वाचा सविस्तर...
मुंबई | 12 डिसेंबर 2023 : गोपीनाथ मुंडे… महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायमचं घर करून असलेलं राजकारणी व्यक्तीमत्व… आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तीमत्वाचे पदर उलगडून दाखवले आहेत. तसंच गोपीनाथ मुंडे आपल्या कायम स्मरणात असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांना आवाहन केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांची जयंती गावागावात साजरा करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
धनंजय मुंडे यांची पोस्ट
स्व.मुंडे साहेब… हे नाव घेतलं की समोर येतो साहेबांचा चेहरा, तो चेहरा ज्याने आयुष्यभर शेतकरी-कष्टकऱ्यांची सेवा केली. दीन-दुबळ्यांचा ते आवाज बनले आणि पोचले घराघरात आणि मनामनात! त्याच साहेबांचा जनसेवेचा ध्यास मनात व कार्यात जोपासत आहे… अप्पा सदैव तुमच्या स्मरणात…
तुमचाच धनंजय
स्व.मुंडे साहेब… हे नाव घेतलं की समोर येतो साहेबांचा चेहरा, तो चेहरा ज्याने आयुष्यभर शेतकरी-कष्टकऱ्यांची सेवा केली. दीन-दुबळ्यांचा ते आवाज बनले आणि पोचले घराघरात आणि मनामनात! त्याच साहेबांचा जनसेवेचा ध्यास मनात व कार्यात जोपासत आहे… अप्पा सदैव तुमच्या स्मरणात…
तुमचाच… pic.twitter.com/GSwxZkauB4
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2023
पंकजा मुंडे यांचं आवाहन काय?
गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांना आवाहन केलं आहे. दरवर्षी आपण गोपीनाथ गडावर येता… तिथं आपण साहेबांची जयंती साजरी करतो. पण गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा आपल्या गावागावात मुंडे साहेबांची जयंती साजरी करा. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरून थोड्याच वेळात आपल्या समर्थकांना संबोधित करणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं आहे. आक्रमक नेते अन् तितकेच मायाळू व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे…लोकनेते मा. गोपीनाथरावजी मुंडे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
लोकनेते मा. गोपीनाथरावजी मुंडे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #Maharashtra #GopinathMunde #महाराष्ट्र #गोपीनाथमुंडे pic.twitter.com/0OcddL1ri2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2023
अजित पवार यांची पोस्ट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. स्वकर्तृत्वानं राजकारण आणि समाजकारण वर्तुळात स्वतःची एक दिलदार नेतृत्व अशी ओळख निर्माण करणारे माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!, असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.
स्वकर्तृत्वानं राजकारण आणि समाजकारण वर्तुळात स्वतःची एक दिलदार नेतृत्व अशी ओळख निर्माण करणारे माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/J2EnkuCU6D
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2023