गाडीची तोडफोड झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांचा कुणावर सर्वात मोठा आरोप?

Hasan Mushrif on car vandalized in Amdar Niwas : मुंबईतील आमदार निवास्थाना बाहेर असणाऱ्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. ही गाडी मंत्री हसन मुश्रीफ यांची आहे. गाडीची तोडफोड झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले हसन मुश्रीफ? पाहा...

गाडीची तोडफोड झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांचा कुणावर सर्वात मोठा आरोप?
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 10:33 AM

मुंबई | 01 नोव्हेंबर 2023 : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील आमदार निवासात मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाली. आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. या तोडफोडीनंतर हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज माझ्या गाडीची तोडफोड झाली. या प्रकरणी कारवाई करू नये, असं मी गृहखात्याला सांगणार आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलनाला नेतृत्व दिसत नाही. या तरूणांना समजावून सांगावं. आंदोलन कसं असावं हे सांगावं, असं नेतृत्व नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.

एकमेकांचे स्थानिक विरोधक असतात. ते टार्गेट करून तेच विरोधक अशा घटना घडवून आणत आहेत की काय? अशी निर्माण होत आहे. आमदार स्वत:ची घरं जाळतील, गाड्या जाळतील असं होईल का? त्यामुळे या घटना कोण घडवून आणतंय ते बघणं गरजेचं आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

आमदारांची घरं जाळणं. त्यांचं कुटुंब घरात असताना दगडफेक करणं, हे अत्यंत दुदैवी आहे. अशा घटना घडता कामा नयेत. या अशा घटनांमुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे. लोकांची जी सहानुभूती या आंदोलनाला आहे. ती देखील निघून जातेय. याचा देखील या आंदोलकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता वारंवार बैठका होत आहेत. चर्चा होत आहेत. आजही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी बोलावली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावाच लागेल, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

मुंबईतील आमदार निवासस्थानी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानकोरे या तीन मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केली आहे. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या तोडफोडीच्या घटनेनंतर हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईतील तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा.
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा.
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?.
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?.
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले.
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.