मुंबईत दोन दिवस उष्णतेचे, पारा चढणार; मुंबईकरांनो घराबाहेर पडताना…

दिवाळीच्या उत्सवाच्या काळात मुंबईत पुढचे दोन दिवस तीव्र उष्णतेचा अंदाज आहे. हवामान खात्याने 35-36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. फटाक्यांच्या वापरामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे हवेच्या गुणवतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्येही हवेची गुणवत्ता ढासळली असून, "वाईट" श्रेणीत वर्गीकृत झाली आहे. मुंबईकरांनी उष्णतेची काळजी घेणे आणि इको-फ्रेंडली फटाके वापरणे आवश्यक आहे.

मुंबईत दोन दिवस उष्णतेचे, पारा चढणार; मुंबईकरांनो घराबाहेर पडताना...
मुंबईत दोन दिवस उष्णतेचेImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 11:20 AM

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यासह मुंबईचा आखाडा चांगलाच तापला आहे. ऐन दिवाळीत राजकारण्यांनी राजकीय फटाके फोडण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे असणार आहेत. हवामान खात्याने तसा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पुढील दोन दिवस स्वत:ची काळजी घ्यायची आहे. पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके अशी परिस्थिती दोन दिवस असणार आहे. आधीच उन्हाच्या झळांनी मुंबईकरांची लाही लाही झाली आहे. त्यात आता उष्णता वाढणार असल्याने मुंबईकरांचा ताप वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत पुढील दोन दिवस कमाल तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे. मुंबईत दोन दिवस कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शहरातील कमाल आणि किमान तापमानात सतत बदल होत असल्याने पहाटे गारवा जाणवतोय तर दुपारी उन्हाचा चटका सोसावा लागत आहे. वातावरणात शुष्क, गरम झळांचे प्रमाण वाढतच आहे. तसेच ही उष्णता दीर्घकाळ राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

मुंबईकर घामाघूम

मुंबईत बदलत्या हवामानामुळे आर्द्रतेत वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडा वाढल्याने मुंबईकर घामाघूम होताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत हवामानात विविध बदल अपेक्षित आहेत. मुंबईत दृष्यमानता कमी झाली आहे. वातावरण धूरकट झाले आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यातच आता दिवाळी असल्याने फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इको फ्रेंडली फटाके वाजवण्याचं आवाहन केलं जात आहे.

नागपूरची ‘हवा’ काय म्हणतेय?

मुंबईपाठोपाठ नागपुरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. केंद्रीय प्रदूषण नियमंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर बुधवारी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 147 इतका नोंदवला गेला. शहरातील अंबाझरी परिसरातील हवेची गुणवत्ता ‘वाईट’ या वर्गात नोंदवण्यात आलीय. दिवाळीत सर्वाधिक फटाके फोडले जातात. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच फटाके फोडले जात आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून शहरात काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाढला असून हवेची गुणवत्ता ‘वाईट’ या श्रेणीत गेली आहे. शहरातील महाल, सिव्हिल लाईन्स आणि रामनगर येथील हवा अत्यंत प्रदूषित झाल्याचं दिसत आहे. गुणवत्ता निरीक्षण केंद्रावर या परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पेक्षा कमी असल्याचं आढळून आलं आहे. अंबाझरी येथील केंद्रात मात्र हाच हवा गुणवत्ता निर्देशांक 209 इतका नोंदवण्यात आलाय. सिव्हिल लाईन्स येथे हा निर्देशांक 103, सर्वच हवा गुणवत्ता निर्देशांक केंद्रावर सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार.
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे.
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं.
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.