High Court | पहिलं लग्न लपवून दुसऱ्या लग्नासाठी शरीरसंबंधाची परवानगी घेणं हा बलात्कार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुंबईत एका व्यक्तीने पहिल्या लग्नाची पत्नी आणि दोन मुले असतानाही एका मराठी अभिनेत्रीसोबत लग्न केले. वास्तव उघड झाल्यानंतर अभिनेत्रीने त्याच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी बलात्काराच्या आरोपातून मुक्त करण्याची याचिका फेटाळली

High Court | पहिलं लग्न लपवून दुसऱ्या लग्नासाठी शरीरसंबंधाची परवानगी घेणं हा बलात्कार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 12:07 PM

मुंबईः पहिले लग्न झाल्याचं लपवलं. दुसरं लग्न केलं आणि शरीर संबंधांसाठी परवानगी मिळवली, हादेखील एक प्रकारचा बलात्कार (Rape in Marriage) आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) एका मराठी अभिनेत्रीने (Marathi Actress) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला आहे. तथाकथित पतीला निर्दोष सोडण्यास न्यायालयाने नकार देताना सदर टिप्पणी केली. एका व्यक्तीने आपण अविवाहित असल्याचा दावा करत घटस्फोटित मराठी अभिनेत्रीसोबत लग्न केलं होतं. मात्र या व्यक्तीची पहिल्या लग्नाची पत्नी तसेच त्याला दोन मुलही आहेत. त्याने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचं खोटं सांगितलं होतं. सदर घटस्फोटाचे खोटे कागदपत्रदेखील दाखवले होते. मात्र ते बनावट असल्याचे सिद्ध झाले. आता सिद्धार्थ बंथिया नावाच्या या वक्तीवर बलात्काराचा खटला चाले. कोर्टाने त्याच्या दुसऱ्या लग्नालाही मान्यता दिलेली नाही.

काय आहे नेमकं प्रकरण?

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, एका कॉमन फ्रेंडने २००८ मध्ये मराठी अभिनेत्री आणि सिद्धार्थ बंथिया यांची भेट घडवून आणली होती. सुरुवातीला त्याने बॅचलर असल्याचं म्हटलं. त्यानंतर 2010 मध्ये अभिनेत्रीला प्रपोज केलं. एक महिन्यानंतर वर्सोवा येथे दोघांनी लग्न केलं. ते सोबत राहू लागले. त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनतर अभिनेत्रीला एक फोन आला. फोनवरून एक महिला बोलत होती. ती सिद्धार्थ यांची पत्नी असून तिला दोन मुलं असल्याचा दावा सदर महिलेने केला. अभिनेत्रीने सिद्धार्थला याचा जाब विचारला असता त्याने आपलं लग्न मोडल्याचं सांगितलं. तसेच घटस्फोटाचे कथित कागदपत्रही दाखवले. त्यानंतर अभिनेत्री आणि सिद्धार्थने एका हॉटेलमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तिचा फोटो वृत्तपत्रात छापल्यानंतर पहिली पत्नी त्याच्या घरी आली आणि तिने गोंधळ घातला. तेव्हा सिद्धार्थने कथित घटस्फोटाचे कागदपत्र बनावट असल्याचं मान्य केलं. त्यानंतर अभिनेत्रीने 2013 मध्येच सिद्धार्थविरोधात बलात्कारासह भादवि कलम 420, 406, 467, 471, 474, 376, 323, 504, 506 (i) आणि 494 अंतर्गत पुण्यातील दत्तवाडीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलं. याविरोधात सिद्धार्थने पुणे सेशन कोर्टात निर्दोष सिद्ध करण्याची मागणी करीत याचिका दाखल केली. सुनावणीनंतर सेशन कोर्टाने 3 डिसेंबर 2022 रोजी बलात्काराचा आरोप रद्द करण्यास नकार दिला. ती याचिका फेटाळली. त्यानंतर सिद्धार्थने बॉम्बे हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला.

हायकोर्टात काय दावा?

लाईव्ह लॉच्या मते, सिद्धार्थने हायकोर्टात दावा केला की लग्न आणि अॅनिव्हरसरी कार्यक्रमाचं नाटक होतं. कारण अभिनेत्रीने एका कार्यक्रमात पतीची भूमिका करण्यास सांगितलं होतं. सिद्धार्थला टीव्ही आणि पिक्चरचा छंद असल्याने तो ही भूमिका करण्यासाठी तयार झाला. तर अभिनेत्रीच्या वकिलाने म्हटले की, सिद्धार्थने पहिले लग्न झालेले असूनदेखील अभिनेत्रीला लग्नासाठी फूस लावली. पती असल्याचं नाटक करत राहिला. त्यामुळे हे प्रकरण भादवि 375 बलात्काराअंतर्गत येते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.