मी जर पवारसाहेबांना सोडलं असतं तर…; जयंत पाटील यांचं ‘टू द पॉईंट’ म्हणणं काय?

Jayant Patil on Sharad Pawar NCP : 'टू द पॉईंट' या चर्चा सत्रात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुलाखत सविस्तर मुलाखत पार पडली. दोन भागात ही मुलाखत पार पडली. नुकताच या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित झाला. यात त्यांनी विविध खुलासे केले आहेत.

मी जर पवारसाहेबांना सोडलं असतं तर...; जयंत पाटील यांचं 'टू द पॉईंट' म्हणणं काय?
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 5:12 PM

अक्षय मंकणी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 30 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीकडून एक मुलाखत सत्र प्रसिद्ध होत आहे. ‘टू द पॉईंट’ या मुलाखत सत्रात खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला. विविध मुद्द्यांवरील त्यांची मतं जाणून घेतली. यातच अजित पवार आणि त्यांच्या समर्थक नेत्यांचं भाजपसोबत जाणं आणि शिंदे सरकारवर सामील होणं याबाबत जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. शरद पवार राजीनामा देणार असल्याचं माहित होतं का? यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरही जयंत पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

“पवारसाहेबांना सोडलं असतं तर…”

राष्ट्रवादी हा पक्ष एकसंध राहावा यासाठी मी प्रयत्न केले. लोकांना वाटलं मीही तिकडे जाईल. पण मी पवारसाहेबांसोबत राहणं निर्णय घेतला. ज्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतला, त्याला त्यांची-त्यांची काही कारणं आहेत. पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे मी जर साहेबांना सोडलं असतं तर त्याचा वेगळा इम्पॅक्ट पडला असता. माझ्यावर विश्वास असताना मी त्यांना सोडलं असतं तर ते योग्य झालं नसतं, असं जयंत पाटील म्हणाले.

पवार राजीनामा देणार असल्याचं माहिती होतं का?

लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा जारीनामा दिला. हा अनेकांसाठी धक्का होता. याबाबत जयंत पाटील यांना माहिती होतं का? असं विचारलं गेलं. तेव्हा, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे काम केलं. तेच नेतृत्व राजीनामा देत असेल तर काय.. म्हणून अश्रूंना वाट मिळाली. मी पक्षाच्या अध्यक्ष होतो पण मला कल्पना नव्हती. कुटुंबातील व्यक्तींना माहिती होती की नाही ते माहित नाही. मी साहेबांना यासाठी दोष देणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

राम मंदिराबाबत भूमिका काय?

आता राम मंदिराचा विषय गाजवला जात आहे. माझ्या मतदारसंघात मी आधीच राम मंदिर बांधलं आहे. गोपीनाथ मुंडेसाहेब आमच्याकडे आले. तेव्हा म्हणाले होते की, आम्ही राम मंदिराच्या बाता करतो तुम्ही प्रत्यक्षात राम मंदिर बांधलं… त्यामुळे आता लोकांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न आहे असे मी म्हणेल. लोकांच्या मूलभूत प्रश्न यातून दुर्लक्ष होईल, असं जयंत पाटील यांमी म्हटलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.