Mumbai, Maharashtra Rains LIVE : विधानभवन परिसरात मुसळधार पाऊस, राज्यात अतिवृष्टी

| Updated on: Jul 02, 2022 | 2:55 PM

Mumbai, Maharashtra Rains LIVE : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट हा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील पावसाची प्रत्येक अपडेट वाचा...

Mumbai, Maharashtra Rains LIVE : विधानभवन परिसरात मुसळधार पाऊस, राज्यात अतिवृष्टी
पाऊस (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट हा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील पावसाची प्रत्येक अपडेट वाचा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Jul 2022 11:32 AM (IST)

    रायगडात पाऊचा जोर वाढला, मासे पकडण्यासाठी तरुणाची गर्दी

    रायगडात पाऊचा जोर वाढला…..वलागणी चे मासे पकडण्यासाठी तरुणाची गर्दी……

    अँकर – गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यात पाऊस  चांगला बरसत आहे.
    पाऊसाच्या पहिल्या सुरुवातीला माश्याची वलगण लागते वलागण म्हणजे अंड्यानी भरलेले मासे हे खवय्यांसाठी एक परवणीच . वलगणी साठी स्थानिक नागरिक शेतात डोहात नदी किनारी मासे पकडण्यासाठी मासेमारी करण्यास जातात.  रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक या ठिकाणी असलेल्या गंगा नदी किनारी वलगणी चे मासे पकडण्यासाठी  स्थानिकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली झिला,मच्छरदाणी घेऊन नागरिक मासेमारी करत होते

  • 02 Jul 2022 11:21 AM (IST)

    Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भुजबळांना दणका

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भुजबळांना दणका

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लावला जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक

    घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी?

    एकनाथ शिंदेंनी केला नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

    कार्यमितीची बैठक घाईघाईने घेऊन मंजूर केले होते 567 कोटींचे काम ..


  • 02 Jul 2022 11:01 AM (IST)

    अरविंद सावंत विधान भवनात

    अरविंद सावंत विधान भवनात दाखल झाले आहेत. आज देखील काही राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

     

  • 02 Jul 2022 10:35 AM (IST)

    कल्याण, बदलापूर अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. 

    कल्याण, बदलापूर अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. आज दिवसभरात मुसळधार पावासाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे

  • 02 Jul 2022 10:06 AM (IST)

    पावसाने उडवला चिपी विमानतळाचा बोजवारा, खराब हवामानाचा प्रवाशांना फटका

    पावसाने उडवला चिपी विमानतळाचा बोजवारा. सलग तीन दिवस विमानसेवा रद्द. खराब हवामानाचा प्रवाशांना फटका. बुधवार,गुरुवार आणि शुक्रवारी सलग तीन दिवस चिपी विमानतळावर विमान उतरलेच नाही. बुधवारी मुंबईहून प्रवासी घेऊन आलेले विमान धावपट्टीवर उतरलेच नाही, दीड तास घिरट्या घालून विमान पुन्हा मुंबईला वळले. गणेशोत्सवात खराब हवामान राहिल्यास प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता.

  • 02 Jul 2022 09:18 AM (IST)

    मावळात पावसाने दडी मारल्याने अनेक धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठलाय

    -मावळ-मुळशीच्या सीमारेषेवर असलेल्या कासारसाई धरणाने तळ गाठला आहे,धरणात सध्या 30% टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पाटबंधारे अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली

    -मावळ आणि मुळशी तालुक्यातील अनेक गावांना याच धरणाचे पाणी पुरवठा होतो,एक महिना पुरेल इतकाच पाणी साठा सध्या धरणात बाकी आहे,जून महिना संपला तरी पावसाचे आगमन झाले नसल्याने शेतकरी ही चिंतेत आहे

  • 02 Jul 2022 08:51 AM (IST)

    निसर्गाचा लहरीपणा आणि पावसाने फिरवली पाठ

    -निसर्गाचा लहरीपणा आणि पावसाने फिरवली पाठ.यामुळे सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या मावळ तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असते मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने मनुष्यसह; प्राणी पक्षी ही चिंतेत आहेत

    -तालुक्यात रोज ढगाळ वातावरण तर असते मात्र पाऊस पडत नाही परंतु रोज पावसाची वाट बघत आपला पिसारा फुलवून मोरांच्या नंदनवनात मोर पावसाची वाट पहात असल्याचं चित्र सध्या मावळात दिसून येत आहे

  • 02 Jul 2022 08:34 AM (IST)

    कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने ही शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

  • 02 Jul 2022 08:32 AM (IST)

    अमरावतीमध्ये वरून राजाला धोंडी काढून साकडं

    30 जूनला मुंबई त धुवाधार पाऊस झाला त्यामुळे रस्त्याने देखील जलमय झाले. अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरलेत मात्र विदर्भात व अमरावती मध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे अमरावतीच्या जावरा या गावी नागरिकांनी धोंडी काढून वरून राजाकडे साकड घातला आहे. धोंडी धोंडी पाणी दे, दाय दाना पिकू दे अशा पद्धतीने वरून राजाला प्रसन्न करण्यात येत आहे यावेळी वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी गावातील मंदिरात महाप्रसाद कार्यक्रम देखील गावकरी मंडळींकडून ठेवण्यात आला आहे

  • 02 Jul 2022 08:32 AM (IST)

    मध्यरात्री पासून वांद्रे सहित इतर भागात पाऊसाची विश्रांती आहे.

    मध्यरात्री पासून वांद्रे सहित इतर भागात पाऊसाची विश्रांती आहे.

  • 02 Jul 2022 08:32 AM (IST)

    आज सकाळपासून मुंबई उपनगरात पाऊस थांबला आहे

    आज सकाळपासून मुंबई उपनगरात पाऊस थांबला आहे

  • 02 Jul 2022 08:31 AM (IST)

    मुंबई विमानतळ परिसरात पावसाची हजेरी

    मुंबई विमानतळ परिसरात पावसाची हजेरी, सांताक्रुझ येथिल विमानतल परिसरात पावसाने हजेरी लावली

  • 02 Jul 2022 08:31 AM (IST)

    मुंबईसह कोकणात येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

    मुंबईसह कोकणात येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे.

  • 02 Jul 2022 06:25 AM (IST)

    रात्री मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

    रात्री मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

  • 01 Jul 2022 11:24 PM (IST)

    मुंबईत पुढचे काही तास पावसाचे असणार

  • 01 Jul 2022 09:37 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीतही मुसळधार पावसाची शक्यता

    सायंकाळी साडेआठच्या सुमारास जोरदार पावसाने कल्याण डोंबिवलीत हजेरी लावली तासाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे डोंबिवली मधील नांदिवली परिसर जलमय झाल्याचे दिसून आले.परिसरातील काही दुकानामध्ये देखील पाणी शिरले आहे. घरी परतणारे नागरिक, रिक्षा चालक, वाहन चालक, दुचाकीस्वार  या परिसरातून साचलेल्या पाण्यातून  वाट काढताना दिसत होते. पावसाचा जोर  कायम राहिल्यास  या परिसरात आणखी भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

  • 01 Jul 2022 09:36 PM (IST)

    पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता

    पालघरमध्ये उद्या पहाटेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय शेतकरी आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आला आहे. 110 मीमी पर्यंत पाऊस याठिकाणी पडण्याचा अंदाज आहे.

  • 01 Jul 2022 09:21 PM (IST)

    नवी मुंबई महानगर पालिकेची माहिती

    नवी मुंबईत पुढचे काही तास हे पावसाचे राहणार आहेत. तशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे आहे…

    NMMC MONSOON 2022

    Rainfall
    01/07/2022,
    08:30 am To 07:30 pm.

    Belapur – 50.40 mm
    Nerul – 60.60 mm
    Vashi – 113.30 mm
    Koparkhairne- 104.30 mm
    Airoli – 94.60 mm
    Digha- 100.80 mm

    Total Avg – 87.33 mm

  • 01 Jul 2022 09:16 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनेचा आढावा

    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज एक महत्वाची बैठक ही पावसाळ्यात वेळेत मदत पोहोचावी यासाठी घेण्यात आली.

  • 01 Jul 2022 09:14 PM (IST)

    अशी असेल मुंबईतील बसची व्यवस्था

    पावसाळ्यातही लोकांना प्रवास करणे सोपे जावे, यासाठी बीएमसीने आणखी काही मार्गाबाबत माहती दिली आहे.

  • 01 Jul 2022 09:12 PM (IST)

    मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस

    मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे बीएमसीकडूनही लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.