मविआचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला, कोण किती जागा लढणार?, वाचा संपूर्ण माहिती…

Mahavikas Aghadi Space Allocation : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे. कोण किती जागा लढणार? याबाबतची माहिती समोर आली आहे. आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी जागावाटप जाहीर करणार आहे. याबाबतची बातमी, वाचा सविस्तर...

मविआचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला, कोण किती जागा लढणार?, वाचा संपूर्ण माहिती...
नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 8:08 AM

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशातच दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अद्याप झालेलं नाही. जागावाटपावरून महाविकास आघाडीत सुरु असलेली रस्सीखेच अखेर आता थांबली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेस सर्वाधिक 105 जागा लढणार आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट 95 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. शरद पवार गट 84 जागांवर लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यात जागावाटप जाहीर केलं जाणार आहे.

कोण किती जागा लढणार?

काँग्रेस- 105

ठाकरे गट – 95

शरद पवार- 84

निवडणूक जाहीर होण्याच्याआधीपासूनच महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी बैठका होत आहेत. मात्र निवडणूका जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी महाविकास आघाडीचं जागावाटप झालं नाही. जागावाटपासाठी मॅरथॉन बैठका झाल्या. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. अखेर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं जागावाटपाबाबत एकमत झालं आहे.

विदर्भातील जागांवरून वाद

महाविकास आघाडीतील नेते जरी सगळं अलबेल असल्याचं सांगत असले. तर जागावाटपावरून विशेषत: विदर्भातील काही जागांवरून आघाडीत वाद होते. लोकसभेला काही जागा काँग्रेसला दिल्याने आता विधानसभेला ठाकरे गट जास्त जागांवर लढण्याबाबत ठाम होता. मात्र काँग्रेस विदर्भातील जागा ठाकरे गटाला सोडण्यासाठी तयार नव्हता. मात्र आता यावर तोडगा निघाला आहे.

नाना पटोले- संजय राऊतांमध्ये वाद

जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीत समिती नेमण्यात आली होती. यात काँग्रेसकडून नाना पटोले, ठाकरे गटाकडून संजय राऊत, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांच्यासह अन्य काही नेते या जागावाटप समितीत होते. त्यांनी जागावाटपावर चर्चा केली. मात्र विदर्भातील जागांवरून वाद टोकाला गेले. नाना पटोले जर चर्चेला असतील तर आम्ही चर्चेला उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका संजय राऊत पर्यायाने उद्धव ठाकरे यांनी घेतली. हा वाद इतका टोकाला गेला की दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना यामध्ये लक्ष घालावं लागलं. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दिल्लीतही काँग्रेसच्या बैठका झाल्या. आथा अखेर हा जागावाटपाचा तिढा सुटला आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.