Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार स्टेजवर थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत जाऊन बसले, आणि मग….

Ajit Pawar | अजित पवार त्या खुर्चीत बसण्याआधी राहुल नार्वेकर यांनी काय केलं? अजित पवारांच्या कृतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आधीच अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आहे.

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार स्टेजवर थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत जाऊन बसले, आणि मग....
ajit pawar
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 11:30 AM

मुंबई : आज मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी एक घटना घडली. त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मनोरा आमदार निवासात 40 आणि 28 मजल्याच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. दोन्ही इमारतीत प्रत्येक फ्लॅट 1000 चौरस मीटरचा असेल. या दोन्ही इमारतींच्या बांधकामावर 1300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांच्या निवासासाठी या इमारती बांधण्यात येणार आहेत. बुहतेकदा आमदार निवासात राज्यभरातून येणारे कार्यकर्ते मुक्कामाला असतात.

आजा मनोरा आमदार निवास भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गो-हे आणि इतर आमदार उपस्थित होते.

अनेकांच्या भुवया उंचावल्या

या भूमिपूजन सोहळ्यावेळी स्टेजवर एक घटना घडली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्टेजवर ऊपमुख्यमंत्र्यांची खुर्ची होती. मात्र, अजित पवार स्टेजवर पोहोचतात अनवधानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मध्यभागी ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसले.

अजित पवार त्या खुर्चीत बसण्याआधी राहुल नार्वेकर यांनी काय केलं?

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले तर दुसरीकडे त्यांच्या खुर्चीवर अजित पवार बसल्याने राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वत: अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्यास सांगितलं. कारण एकनाथ शिंदे आजच्या कार्यक्रमाला हजर नव्हते. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याआधी राहुल नार्वेकर यांनी त्यावरील स्टिकर काढून टाकला. राहुल नार्वेकर काय म्हणाले?

या सर्व प्रसंगानंतर राहुल नार्वेकर यांनी या सर्व निरर्थक चर्चांना प्रोत्साहन देऊ नये असं म्हटलं आहे. “राज्यासाठी गौरवशाली कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री व्यक्तीगत अडचणीमुळे येऊ शकले नाहीत” असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.