निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा…

मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मेट्रो वन प्रशासनाने 20 नोव्हेंबर रोजी पहाटे लवकर आणि रात्री उशीरापर्यंत मेट्रो फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा...
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 8:02 PM

मुंबईसह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आपल्या फेऱ्यांच्या वेळात बदल केलेला आहे. पालिका आणि इतर निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोच्या फेऱ्या पहाटे लवकर ते मध्यरात्री उशीरापर्यंत सुरु राहणार आहेत.

विधानसभा निवडणूकीचे मतदान असणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी वर्सोवा ते घाटकोपर मुंबई वन मेट्रोची पहिली फेरी पहाटे 4 वाजता सुटेल. आणि शेवटची फेरी दोन्ही स्थानकावरुन ( 21 नोव्हेंबर रोजी ) मध्यरात्री 1 वाजता सुटणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर इलेक्शन ड्यूटीसाठी वेळेत पोहचण्यासाठी ड्युटीसाठी मेट्रो वनच्या फेऱ्या सकाळी लवकर आणि रात्री उशीरा सोडण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी सुविधा

मुंबई मेट्रो प्रशासनाने मेट्रो मार्गाशी कनेक्टेट असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर निवडणूक कर्मचाऱ्यांना या वेळेत लोकल मिळेल अशी तजवीज रेल्वे प्रशासनाने करावी असे आवाहनही मुंबई मेट्रो वन प्रशासनाने केले आहे. निवडणूक काळात पोलिंग बुथवर साहित्य घेऊन पोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोय देणे हे आपले कर्तव्य असल्याचे मेट्रो वन प्रशासनाने म्हटले आहे. एरव्ही मेट्रो वनची पहिली फेरी घाटकोपरहून सकाळी 5.30 वाजता आणि शेवटची फेरी रात्री 11.45 वाजता सुटते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.