आमदारांची घरं पेटवली, गाड्या फोडल्यानंतर मंत्री आणि आमदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

Minister and MLA Home Security : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला. राज्यातील नेत्यांच्या घरांवर दगडफेक होत आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आमदारांची घरं पेटवली, गाड्या फोडल्यानंतर मंत्री आणि आमदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 3:06 PM

मुंबई | 01 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिक तीव्र झाला आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांच्या घरांना पेटवण्यात आलं. दगडफेक करण्यात आली. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंकी यांच्या घराला पेटवण्यात आलं. त्यानंतर आज मुंबईतील आमदार निवासात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर दगड फेक करण्यात आली. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. राज्यातील नेत्यांच्या घरांना आता पोलीस संरक्षण देण्यात आलंय. हा पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आला आहे. मंत्र्यांसह आमदारांच्या घरांजवळ आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील घराबाहेरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भुजबळ फार्मला पोलिसांचं संरक्षण आहे. मुंबईपाठोपाठ भुजबळांच्या नाशिकच्या घराला देखील पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळत असल्याने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे सध्या मुंबईत आहेत. मात्र कुटुंबियांच्या संरक्षणासाठी हा बंदोबस्त तैनात आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. मंत्रालय परिसरात असलेल्या आमदार निवासात हसन मुश्रीफ यांची गाडी होती. या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी मुश्रीफ यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यानंतर मुश्रीफ यांच्या कोल्हापूरमधल्या कागलच्या घरी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात आमदार, खासदार आणि मंत्री यांना बहुतांश गावात बंदी करण्यात आली आहे . अशात आता मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलक मागणी करत आहेत. त्यामुळे आता अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या बाभळगावमधील घरीही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्यासह खासदार सुधाकर शृंगारे, मंत्री संजय बनसोडे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरा समोर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. खबरदारी म्हणून पोलिसांकडून हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.