जरंडेश्वर कारखाना प्रकरणात क्लीन चीट मिळाली की नाही? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, प्रतिक्रिया काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी त्यावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. याशिवाय काँग्रेस नेत्याच्या भूमिकेवरूनही नाराजी व्यक्त केली आहे.

जरंडेश्वर कारखाना प्रकरणात क्लीन चीट मिळाली की नाही? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, प्रतिक्रिया काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 2:03 PM

मुंबई : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात ईडीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबासह त्यांच्या नातलगांची चौकशी केली होती. या संदर्भात अजित पवारांना एकदाही ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं नाही. त्यासाठी पाठविण्यात येणारे समन्सही दिले गेले नाही. त्यावरून अजित पवार यांना ईडीने क्लीन चिट दिलीय का? अशी चर्चा सुरू झाली होती. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ट्विट करून अजित पवार हे भाजपच्यासोबत जाणार असल्याचे म्हंटलं होतं.

सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या संदर्भात बोलत असताना अजित पवार हे भाजपसोबत 15 ते 20 आमदारांना घेऊन जाणार असल्याची माहिती दिली होती त्यानंतरच अजित पवार यांना जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात क्लीन चिट दिल्याची चर्चा सुरू झाली होती.

त्यावर अजित पवार यांनी म्हंटलंय, ईडी कडून चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लीन-चिट मिळालेली नाहीये. ती बातमी कशाला अनुसरून दिली मला काही कळायला मार्ग नाही. पण मी आज स्पष्टपणे सांगू इच्छितो की अशा प्रकारची क्लीन चीट मिळालेली नाही.

हे सुद्धा वाचा

अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांच्या बहिणींच्या घरी इडी कडून काही दिवसांपूर्वी छापेमारी झाली होती. जरंडेश्वर साखर कारखान्यातही ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. त्यानंतर अनेक नेत्यांना ईडी कडून समन्स बजावण्यात आले त्यांची चौकशी करण्यात आली.

मात्र ,अजित पवारांना कुठलेही समन्स आले नाहीत. त्यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाली. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी अजित पवार पंधरा आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला त्यावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासाह पंधरा आमदार हे अपात्र होतील असेही अंजली दामनिया यांनी म्हंटलं होतं.

याशिवाय अजित पवार यांनी महाविकास आघाडी जर टिकवायची असेल तर बैठकीत बोलले पाहिजे, मीडिया समोर बोलण्याची गरज नाही. आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारंवार तसं करत असल्याचे सांगत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरून महाविकास आघाडीत नाना पटोले यांची भूमिका अजित पवार यांना पटत नाही का? असेही बोलले जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.