राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा कुणी घेतला धसका, अचानक ईडीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, काय आहे कारण?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात एकीकडे प्रवेश होणार असल्याने दुसऱ्या बाजूला ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर बंदोबस्त का यावरून जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा कुणी घेतला धसका, अचानक ईडीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, काय आहे कारण?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 2:03 PM

मुंबई : आज मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार आहे. खरंतर मोठी गर्दी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर होणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक नेते ईडीच्या रडारवर आहे. त्याध्ये छगन भुजबळ, अनिल देशमुख नवाब मलीक यांना ईडीने अटक केली होती तर हसन मुश्रीफ यांची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांची जामीनावर सुटका झाली आहे. मात्र सध्या हसन मुश्रीफ यांच्यामागे चौकशीचा फेरा लागला असून ईडीकडून त्यांची अनेकदा चौकशी केली जात आहे.

त्याच पार्श्वभूमीवर ईडीकडून होत असलेल्या कारवाईच्या विरोधात हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आक्रमक झाले होते. कागल येथील निवासस्थानी ईडीचे अधिकारी चौकशी करत असतांना मुश्रीफ यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमले होते.

त्याच दरम्यान कोल्हापूर येथील शेकडो कार्यकर्ते आज मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रवेशा साठी येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, अचानक हेच कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

त्याच पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयात बाहेर मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. राज्य राखीव दलालाही पाचारण करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आंदोलन करू शकतात अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने हा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणत्याही क्षणी आंदोलन करू शकतो या मिळालेल्या माहितीद्वारे लावण्यात आलेला पोलिस बंदोबस्त बघता ईडीच्या कार्यालयाबाहेर छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

खरंतर ईडीचे कार्यालय आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. त्यात कोल्हापूर मधील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश आत्ताच का करत आहे ? यामुळे पोलिसांना संशय आला आणि मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे.

मागील दोन आठवड्यापासून हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपावरुन त्यांची चौकशी केली जात आहे. त्यामध्ये साखर कारखान्यातसह बनावट कंपन्या स्थापन करून कोट्यवधी रुपयांचा घोटाला केल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.

त्यावरून आंदोलन करण्याची भूमिका कोल्हापूर मधील कार्यकर्त्यांनी घेतली होती का? पोलिसांनी याचाच धसका घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ईडीच्या बाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.