मित्र पक्षाच्या मतदारसंघात भाजप डोकावणार?, काय आहे रणनीती?; शिंदे गट आणि अजितदादा काय करणार?

BJP Strategy For Shivsena NCP MLA Constituency : भाजपचे आमदार नसलेल्या मतदारसंघात लोकांची कामं व्हावीत, यासाठी मोठी रणनीती आखली आहे. काय आहे रणनिती? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच भाजपने हे मोठं पाऊल उचललं आहे. वाचा सविस्तर...

मित्र पक्षाच्या मतदारसंघात भाजप डोकावणार?, काय आहे रणनीती?; शिंदे गट आणि अजितदादा काय करणार?
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 12:26 PM

विनायक डावरूंग, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 09 डिसेंबर 2023 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपनेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र केवळ आपले आमदार खासदार असणाऱ्या मतदारसंघात भाजप काम करत नाहीये. तर मित्र पक्षांच्या मतदारसंघातही भाजपने तयारी सुरु केली आहे. शिवसेना आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातही भाजपने कामाची स्टॅटर्जी आखली आहे. नवी रणनिती आखत भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

मुंबईत भाजपची ‘वॉररूम’

मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्येही कामं व्हावीत, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. आता वॉररूम प्रत्येक मंत्र्याकडे फॉलोअप असेल. भाजपने नवी रणनीती आखली आहे.शिवसेना- शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट विरोधी पक्षांचे आमदार असलेल्या मतदारसंघातही भाजपने लक्ष घातलं आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते नेते यांची कामं होत नाहीत. या नाराजीची दखल घेत आता भाजपचे आमदार नसलेल्या मतदारसंघांमध्ये आपल्या माणसांची कामे तत्काळ व्हावीत यासाठी रणनीती भाजपने आखली आहे. त्यासाठी मुंबईत वॉररूम सुरू करण्यात आली आहे.

कुणाकडे कोणती जबाबदारी?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध विकासकामांची मागणी करणारी भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची दीड हजारापेक्षा जास्त पत्रं एकत्र करून त्यांची छाननी करण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना भाजप आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयक म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमणण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी श्रीकांत भारतीय यांना ओएसडी म्हणून नियुक्त केलं होतं. भाजप आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयक म्हणून जबाबदारी दिली होती.

शिंदे आणि अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष

महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदाराच्या मतदारसंघांसाठी भाजपने रणनिती आखली आहे. अशात आता शिंदे गट आणि अजित पवार काय करणार? याकडे सर्वांच लक्ष आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने घेतलेली ही भूमिका महायुतीसाठी किती फायदेशीर ठरणार? हे पाहणंही महत्वाचं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.