Mumbai : धक्कादायक ! प्रसिद्ध हॉटेलच्या व्हेज जेवणात सापडला मेलेला उंदीर

मुंबईतील एक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका ग्राहकाच्या शाकाहारी जेवणात मृत उंदीर सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. एका आलिशान आणि प्रसिद्ध हॉटेलमधून ((Barbeque Nation) हे जेवण मागवण्यात आलं, त्यात मेलेला उंदीर सापडला.

Mumbai : धक्कादायक ! प्रसिद्ध हॉटेलच्या व्हेज जेवणात सापडला मेलेला  उंदीर
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 1:59 PM

मुंबई | 17 जानेवारी 2024 : मुंबईतील एक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका ग्राहकाच्या शाकाहारी जेवणात मृत उंदीर सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. एका आलिशान आणि प्रसिद्ध हॉटेलमधून ((Barbeque Nation) हे जेवण मागवण्यात आलं, त्यात मेलेला उंदीर सापडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. राजीव शुक्ला असे त्या इसमाचे नाव असून त्याला या सगळ्याची झळ बसली. त्याने आता बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेनी नाही.

मूळचे प्रयागराज येथील असलेले राजीव शुक्ला हे कामानिमित्त मुंबईत आले होते. 8 जानेवारी रोजी त्यांनी वरळीतील बार्बेक्यू नेशनमधून व्हेज जेवण मागवले. मात्र त्यातील दाल मखनी खाल्ल्यावर त्यांना काहीतरी विचित्रच चव लागली. म्हणून त्यांनी त्या डब्याची नीट तपासणी केली असता त्यामध्ये मेलेला उंदीर आणि झुरळ आढळलं. एवढंच नव्हे तर ते जेवण जेवल्यावर त्यांची तब्येत बिघडली. पोटदुखी,मळमळ असा त्राही जाणवू लागला. राजीव यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. पुढचे 75 तास (तीन दिवस) ते रुग्णालयातच होते.

पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही

राजीव शुक्ला यांनी बार्बेक्यू नेशनचे मालक, व्यवस्थापक आणि शेफ यांच्याविरुद्ध नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. परंतु अद्याप एफआयआर झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

यासंदर्भात बीबीक्यूने निवेदन दिलं आहे, आम्हाला राजीव शुक्ला नावाच्या इसमाकडून तक्रार मिळाली. 8 तारखेला ऑर्डर केलेल्या जेवणात कीटक आढळल्याचं त्यांनी नमूद केलं. आम्ही अंतर्गत तपासणी केली. पण आम्हाला कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत. कोणत्याही तपासणीसाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.